आशियातील शेअर मार्केटमध्येही दोन आठवडी मोठं नुकसान झालं. या आठवड्यात गुंतवणूकदार शेअर बाजारातील प्रमुख घडामोडींवर लक्ष ठेवतील, ज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, परकीय निधीचा ओघ, मध्य-पूर्व भू-राजकीय तणाव, यूएस बाँड यिल्ड, यूएस डॉलर, कच्च्या तेलाच्या किमतींचा कल, जागतिक बाजारातील संकेत आणि इतर देशांतर्गत आणि जागतिक आर्थिक डेटा या सगळ्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे.
advertisement
गुरु नानक जयंतीनिमित्त शुक्रवारी भारतीय शेअर बाजार बंद होता. सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांनंतर आज शेअर बाजारात काय स्थिती निर्माण होते याची धाकधूकही गुंतवणूकदारांना आहे. 9.30 वाजता शेअर मार्केटची स्थिती गुंतवणूकदारांना दिलासा देणार की चिंता वाढवणार ते पाहावं लागणार आहे.
भारतीय शेअर बाजाराचे बेंचमार्क निर्देशांक गुरुवारी घसरणीसह बंद झाले, त्यामुळे सलग सहाव्या सत्रात तोटा झाला. सेन्सेक्स 110.64 अंकांनी किंवा 0.14 टक्क्यांनी घसरून 77,580.31 वर बंद झाला, तर निफ्टी 50 26.35 अंकांनी किंवा 0.11 टक्क्यांनी घसरून 23,532.70 वर बंद झाला.
प्री ओपनिंगची सुरुवात चांगली आहे. शेअर बाजाराने चांगले संकेत दिले आहेत. आज सोनं चांदी देखील 700 आणि १००० रुपयांनी वाढलेलं आहे. सेन्सेक्स 0.22 टक्क्यांनी तर निफ्टी 0.34 अंकांनी वधारलेलं आहे. हीच स्थिती आज कायम राहिली तर गुंतवणूकदारांना सुगीचे दिवल लवकरच येतील असं म्हणायला हरकत नाही.