TRENDING:

लोकांचं लक्ष सोन्यावर पण चांदीने मारली बाजी, आतापर्यंतचे मोडले सगळे रेकॉर्ड

Last Updated:

दिल्लीच्या सराफ बाजारात चांदीने नवा उच्चांक गाठला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. लीसा कुक हटवण्याचा परिणाम दिसतो.

advertisement
लोक सोनं सोनं करत राहिले मात्र सोन्यामागून येऊन चांदीने बाजी मारली आणि पुन्हा एकदा सगळे रेकॉर्ड मोडीत काढत नवा विक्रम केला आहे. चांदीचे दर ऐतिहासिक उंचीवर पोहोचले आहेत. इकडे लोक सोनं खरेदी करत राहिले पण चांदीचे दर सोन्यापेक्षा जास्त आहेत हे मात्र कुणाच्याच लक्षात आलं नाही. सोमवारच्या तुलनेत चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ झाली. चांदीचे दर 1 लाख 20 हजार रुपयांवर पोहोतवे आहेत. दिल्लीच्या सराफ बाजारात चांदीने नवा उच्चांक गाठला आहे.
News18
News18
advertisement

चांदी 3000 रुपयांनी वाढल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे, दोन दिवसांत चांदी 5,000 रुपयांनी महाग झाली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर दिसून आला.

advertisement

सोन्याचे दरही वाढले

चांदीसोबतच सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. दिल्लीत बुधवारी 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 500 रुपयांनी वाढून 1,01,270 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे GST सह हे दर एक लाख 2 हजार रुपयांच्या आसपास आहेत. मागील दिवसाच्या तुलनेत 23 कॅरेट सोन्याचे भावही 400 रुपयांनी वाढले असून एक लाख रुपयांवर प्रति तोळा पोहोचले आहेत.

advertisement

ऑगमोंट रिसर्चच्या प्रमुख रेनीशा चैनानी यांच्या मते, सोन्या-चांदीतील ही वाढ वाढत्या राजकीय अनिश्चिततेमुळे झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर लीसा कुक यांना अचानक पदावरून हटवले. या निर्णयामुळे फेडरल रिझर्व्हच्या स्वातंत्र्य आणि धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ट्रम्प यांच्या घोषणेनंतर अमेरिकन डॉलर कमजोर झाला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीला फायदा झाला. मात्र, नंतर डॉलरने काही प्रमाणात पुन्हा वाढ घेतली. तरीही, न्यूयॉर्कमध्ये स्पॉट गोल्ड 0.55 टक्क्यांनी घसरून 3,375.08 डॉलर प्रति औंसवर होते, तर चांदी 1 टक्क्यांनी घसरून 38.23 डॉलर प्रति औंसवर पोहोचली होती.

advertisement

यापूर्वीही ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हवर दबाव आणला होता. फेड चेअर जेरोम पॉवेल यांना पदावरून हटवण्याची धमकी त्यांनी दिली होती. लीसा कुक यांना अचानक पदावरून हटवल्यामुळे राजकीय संघर्ष आणि आर्थिक अस्थिरता आणखी वाढली आहे, ज्याचा परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतीवर स्पष्टपणे दिसत आहे. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलथापालथ होत आहे, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
लोकांचं लक्ष सोन्यावर पण चांदीने मारली बाजी, आतापर्यंतचे मोडले सगळे रेकॉर्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल