या तेजीमागे अनेक प्रमुख कारणे आहेत
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीची शक्यता
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 25 बेसिस पॉइंटची कपात केली होती. या निर्णयामुळे गुंतवणूकदार आता भविष्यातही आणखी व्याजदर कपातीची अपेक्षा करत आहेत. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढतो, कारण त्यातून चांगला परतावा मिळतो. त्यामुळेच सध्या सोन्या-चांदीच्या दरांना मोठी चालना मिळाली आहे.
advertisement
औद्योगिक मागणीत वाढ
चांदी केवळ दागिने आणि गुंतवणुकीसाठीच नाही, तर औद्योगिक क्षेत्रातही तिचा मोठा वापर होतो. सध्या सौर ऊर्जा पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने (EVs) आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकूण जागतिक मागणीपैकी ६०% मागणी औद्योगिक क्षेत्राकडून येते. यामुळे, औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.
पुरवठ्याचा तुटवडा
सध्या जागतिक बाजारपेठेत चांदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, पण खाणीतून मिळणाऱ्या चांदीच्या उत्पादनात वाढ झालेली नाही. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चांदीच्या किमती वाढत आहेत. यामुळे भविष्यातही चांदीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे चांदी सध्या गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय बनली आहे आणि अनेक गुंतवणूकदार सोन्यापेक्षा चांदीला अधिक महत्त्व देत आहेत.
चांदीचे दर अचानक एवढे वाढल्याने आता चांदी मागणी कमी होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सराफ मार्केटवर होऊ शकतो. दसऱ्याला सोनं-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. त्याआधीच दर गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे यंदाचा दसरा दिवाळी सोनं चांदी खरेदी न करताच होतोय का? सराफ मार्केटकडे लोक पाठ फिरवणार अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ज्यांनी सोन्या चांदीत ETF, फंड्समधून गुंतवणूक केलीय त्यांना मोठा फायदा झाला आहे.