TRENDING:

73 वर्षांच्या आजींच्या हातात जादू! बालपणीचा छंद आता कमाईचं साधन, बांबूच्या वस्तूंना मोठी मागणी

Last Updated:

Bamboo Art: बालपणी जोपासलेला बांबू केलेचा छंद म्हातरपणी उत्पन्नाचे साधन बनला आहे. विविध शोभेच्या वस्तू बनवून 37 वर्षीय अपर्णा कांबळे चागंली कमाई करत आहेत.

advertisement
सितराज परब, प्रतिनिधी
advertisement

सिंधुदुर्ग: शिक्षण कधी वाया जात नाही अन् कला कधी उपाशी मरू देत नाही, अशा म्हणी आपल्याकडे प्रचलित आहेत. सिंधुदुर्गमधील एका आजींच्या बाबतीत हे खरं ठरलंय. लहान असताना छंद म्हणून त्या बांबूपासून वस्तू बनवायला शिकल्या. परंतु, आता वयाच्या 73 व्या वर्षी हीच बांबूच्या वस्तू बनवण्याची कला त्यांच्या उत्पन्नाचं साधन बनलं आहे. कणकवली तालुक्यातील अपर्णा अशोक कांबळे या आजी बुरूड कलेतून शोभेच्या वस्तू बनवतात. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच आपली गुजराण करत आहेत.

advertisement

अपर्णा कांबळे यांना लहानपणापासूनच बुरुड कलेचे आवड होती. बांबूपासून विविध शोभेच्या वस्तू छंद म्हणून त्या बनवत असत. परंतु, पुढील काळात घर, संसार यामुळे या छंदाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, काही वर्षांपूर्वी त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं आणि त्यांना घरात बसून राहावं लागलं. घरात मन रमत नव्हतं. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी त्यांनी बांबूच्या वस्तू बनवायला सुरुवात केली. आकर्षक व सुबक असे विणकाम असल्याने त्यांच्या या वस्तू लोकांना प्रचंड आवडू लागल्या आणि त्यांच्या वस्तूंना मागणी देखील वाढली, असे अपर्णा सांगतात.

advertisement

ऐन दिवाळीत कोकणचा हापूस बाजारात, कसं झालं शक्य? पहिल्या पेटीला किती भाव?

मागणीनुसार विविध वस्तूंची निर्मिती

लोकांच्या मागणीनुसार अपर्णा यांनी विविध वस्तू बनवून देण्यास सुरुवात केली. यामध्ये टोपी, पर्स, शोभेच्या वस्तू, कंदील, खेळणी आदी वस्तू त्या बनवतात. यासाठी लागणार कच्चा माल बांबू त्या विकत घेतात. त्यापासून स्वतः हाताने त्या विविध वस्तू बनवतात. या वस्तूंची किंमत 50 रुपयांपासून सुरु आहे. या वस्तू त्या स्थानिक बाजापेठेमध्ये विकतात. बांबूच्या वस्तू आकर्षक असल्याने कणकवलीत येणारे पर्यटक त्या आवर्जून खरेदी करतात.

advertisement

महिलेने लढवली वेगळी शक्कल, रेल्वे प्रवाशांना देते जेवण, वर्षाला 8 लाखांची कमाई

कशा बनवतात बांबूच्या वस्तू?

बांबूचे तुकडे करून त्याला बारीक तासले जाते. त्या तसलेल्या बांबूपासून हाताने विणकाम केले जाते. हे विणकाम वेगवेगळ्या डिझाईन मध्ये केले जाते. यामध्ये विणकाम केल्यामुळे त्या वस्तू देखील मजबूत बनतात. नंतर त्या वस्तुंना पॉलिश करून त्या विक्री केल्या जातात. या वस्तू हाताने बनवल्या जात असल्याने त्याला वेळ व श्रम अधिक लागतात. त्यामुले या कलेकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. परंतु, ही कला पुढच्या पिढीपर्यंत गेली पाहिजे, असे अपर्णा सांगतात.

advertisement

दरम्यान, बालपणी छंद म्हणून जोपासलेली कला अपर्णा यांना म्हातरपणी उपयुक्त ठरत आहे. या बांबूच्या वस्तू विकून त्यांना चांगली कमाई देखील होतेय.

मराठी बातम्या/मनी/
73 वर्षांच्या आजींच्या हातात जादू! बालपणीचा छंद आता कमाईचं साधन, बांबूच्या वस्तूंना मोठी मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल