महिलेने लढवली वेगळी शक्कल, रेल्वे प्रवाशांना देते जेवण, वर्षाला 8 लाखांची कमाई

Last Updated:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सांची कुडाळकर या महिलेने एक वेगळी शक्कल लढवत एका वेगळ्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्यांनी कॅटरर्सच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे.

+
News18

News18

सितराज परब, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : महिला सगळ्याच क्षेत्रात उत्तम काम करतात. आताच्या काळात असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला काम करत नाही. चाकोरीबद्ध जीवन झुगारत काहीतरी वेगळे करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांनी स्वत:ला सिद्ध करुन दाखवले आहे. फार पूर्वीपासूनच काही महिलांनी आपल्या कलागुणांनी आणि अभ्यासू वृत्तीने समाजाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळवून दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सांची कुडाळकर या महिलेने एक वेगळी शक्कल लढवत एका वेगळ्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. त्यांनी कॅटरर्सच्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. यामधून वर्षांकाठी त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
सांची कुडाळकर यांना व्यवसायात पाहल्यापासून आवड आहे. परंतु कोणता व्यवसाय करावा हा विचार त्यांच्या मनात घर करत होता. असाच विचार त्यांच्या मनात चालू असताना त्यांच्या मोबाईल वर एका व्हाट्सअँप ग्रुपला मेसेज आला की कोकणात कोणी दहा माणसांचे जेवण बनवून ट्रेनला पार्सल देऊ शकत का? त्या वेळी लगेच त्या मेसेजला ऊत्तर देऊन सांची कुडाळकर यांनी त्यांना घरगुती जेवण बनवून दिले. त्या प्रवाशांना ते जेवण प्रचंड आवडलं आणि त्यांनी ही संकल्पना यांच्या मनात घातली.
advertisement
वाहनांतून होणाऱ्या प्रदुषणावर तोडगा, पुणेकर तरुणानं बनवलं एअरफिल्टर, तब्बल 50 लाखांची कमाई
मग सांची कुडाळकर यांना ही संकल्पना आवडल्याने त्यांनी हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सर्वप्रथम सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला हा व्यवसाय लोकां पोचवण्याचा पर्यंत केला. नंतर कोकण रेल्वेच्या प्रवाशी ग्रुपना देखील त्याची जाहिरात केली आणि व्यवसायास सुरुवात केली.
advertisement
आज कोकण रेल्वेरुळावर धावणाऱ्या गाडीतील प्रवाशांच्या जेवणाच्या ऑर्डर त्या घेत आहेत. ऑर्डरचे जेवण घरीच बनवून रेल्वेगाडीच्या वेळेवर स्टेशनवर आणून देऊन त्यांना वेळेत पोच करतात. यामध्ये प्रवासी मागतील त्या पद्धतीचे जेवण त्यांना बनवून देतात. त्यामध्ये वरण भात, भाजी, चपाती, कोंबडीवडे अशा विविध पद्धतीचे जेवण त्या बनवून त्या देतात. याची किंमत 100 रुपयांपासून सुरु होते.
advertisement
या व्यवसायाविषयी माहिती देताना सांची कुडाळकर सांगतात की, या व्यवसायातून मला एक मोठा आर्थिक फायदा देखील होतो. लोकांना घरगुती जेवणाची आवड जास्त असते. त्यामुळे प्रवाशांच्या ऑर्डर देखील मोठ्या प्रमाणात असतात. या व्यवसायातून  वर्षाकाठी 7 ते 8 लाखाचा नफा होतो. या व्यवसायात मला मुलगा, मुलगी देखील मदत करतात.
view comments
मराठी बातम्या/मनी/
महिलेने लढवली वेगळी शक्कल, रेल्वे प्रवाशांना देते जेवण, वर्षाला 8 लाखांची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement