“सुरुवातीला मी गिरणीच्या माध्यमातून दळण दळण्याचे काम करायचे. केवीके अंतर्गत एका प्रदर्शनामध्ये आम्ही धपाटे निर्मितीचा स्टॉल लावला होता. तेव्हा एका आजीने आम्हाला धपाट्याचं पीठ मागितलं. त्यानंतरच 30 मार्च 2022 रोजी माझ्या मनात हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. मग छोट्या स्तरावर आम्ही घरीच पीठ निर्मिती करण्यास सुरुवात केली,” असं गंगासागर सांगतात.
advertisement
भंगारातून एक एक साहित्य घेतलं, दिव्यांगासाठी बनवली व्हीलचेअर, खास VIDEO
कसं बनतं धपाट्याचं पीठ?
“माझ्याकडे दोन एकर शेती आहे. या शेतीमध्ये मी रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी करते. ही ज्वारी हुरड्यात आल्यानंतर त्याची कणसे काढून आणली जातात. ती भाजून तो हुरडा वाळवला जातो. यापासूनच धपाट्याचे पीठ तयार केलं जातं. अशा पद्धतीने 2022 पासून माझा हा उद्योग सुरू झाला,” असंही त्यांनी सांगितलं.
धपाट्याचे पीठ तयार करण्यासाठी ज्वारीचा वाळलेला हुरडा, काही प्रमाणात गहू, प्रमाणानुसार हरभऱ्याची डाळ, जिरे आणि ओवा अशा प्रकारचे साहित्य आवश्यक असते. या सर्व साहित्यांना एकत्र करून पीठ गिरणीतून काढून घ्यावे लागते. या पिठाला 150 रुपये प्रति किलो असा होलसेल दर मिळतो. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर अशा मोठ्या शहरांमध्ये कुरिअरद्वारे या पिठाची विक्री केली जाते. सुरुवातीला वार्षिक केवळ एक क्विंटल पिठाची विक्री व्हायची. आता ही विक्री वार्षिक 18 क्विंटल पर्यंत पोहोचली आहे.
5 लाखांचा निव्वळ नफा
पीठ विक्रीच्या व्यवसायातून तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो. तर मुंबई आणि इतर ठिकाणी लावलेल्या स्टॉलमध्ये धपाटे विक्रीतून दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. अशा प्रकारे वार्षिक 4 ते 5 लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न होत असल्याचं गंगासागर लहू पडघनकर यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.