TRENDING:

Stock Drop: शेअर बाजार पॅनिक, स्वस्तात मिळाले म्हणून 1661 कोटीचे शेअर्स घेतले, बसला मोठा तडाखा

Last Updated:

Share Market: राधाकिशन दमानी यांनी डिसेंबर 2024 मध्ये वीएसटी इंडस्ट्रीजच्या 5 कोटी शेअर्सची खरेदी केली होती. मात्र अवघ्या दोन महिन्यांत या गुंतवणुकीचे मूल्य 24% ने घसरले आहे.

advertisement
मुंबई: भारतीय शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे सर्वच गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. फक्त छोटे किंवा नवे नाही तर मोठ्या आणि अनुभवी गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय शेअर बाजारात दिग्गज अशी ओळख असलेल्या अनेकांना या घसरणीचा धक्का बसला आहे. याला अनुभवी गुंतवणूकदार राधाकिशन दमानीही अपवाद ठरलेले नाहीत. दमानी यांना भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक मानले जाते.
News18
News18
advertisement

एवेन्यू सुपरमार्ट्स (D-Mart) चे संस्थापक असलेल्या दमानी यांनी डिसेंबर 2024 मध्ये VST Industries Ltd. मध्ये तब्बल 1,661.84 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मात्र, अवघ्या दोन महिन्यांत या गुंतवणुकीचे मूल्य 1,215 कोटींवर घसरले आहे. म्हणजेच त्यांना 447 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

शेअर बाजाराचा बॅलन्स बिघडला, इतिहासातील सर्वात मोठी घसरण

advertisement

VST Industries  

VST Industries ही एक प्रसिद्ध तंबाखू उत्पादक कंपनी असून, ती सिगारेट आणि अनिर्मित तंबाखूचे उत्पादन आणि विक्री करते. या कंपनीची स्थापना 1930 साली झाली होती आणि तिचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. कंपनीचे उत्पादन युनिट तेलंगणातील हैदराबाद आणि तूप्रान येथे आहेत. ही कंपनी BSE आणि NSE वर सूचीबद्ध आहे आणि भारतीय शेअर बाजारातील महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक मानली जाते.

advertisement

शेअर बाजारात अनोखा ट्विस्ट, इन्व्हेस्टर्स गोंधळले, अजून एक धोक्याची घंटा?

...आणि दमानींचे नुकसान

दमानी यांनी डिसेंबर 2024 च्या तिमाहीत VST Industries चे मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी केले होते. त्या वेळी या शेअरची किंमत 373 रुपये होती. मात्र, त्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली आणि 3 मार्च 2025 रोजी या शेअरने 242.10 रुपयांपर्यंत खालचा स्तर गाठला. 4 मार्च 2025 रोजी बाजार संपताना हा शेअर 249.60 रुपयांवर बंद झाला. या घसरणीमुळे दमानींच्या गुंतवणुकीला मोठा फटका बसला आहे.

advertisement

VIP ग्रुपचा मेंबर झाला, रात्री व्हायचा क्लास; महिन्यानंतर पायाखालची जमीन सरकली

दमानी यांचा गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ

राधाकिशन दमानी हे केवळ D-Mart चे संस्थापक नसून, अनेक कंपन्यांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडे D-Mart च्या 72.18% शेअर्सची मालकी आहे. याशिवाय त्यांनी ट्रेंट (3,210 कोटींची गुंतवणूक), सुंदरम फायनान्स ( 1,176 कोटींची गुंतवणूक) आणि इतर 12 कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

advertisement

आता दमानी पुढे काय करणार?

दमानी यांनी VST Industries मध्ये आपल्या पोर्टफोलिओच्या 29.10% गुंतवणूक केली होती. मात्र, आगामी तिमाहीत ते या शेअरमधील आपली हिस्सेदारी टिकवतात की खालील दराने अजून खरेदी करून सरासरी किंमत कमी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

मराठी बातम्या/मनी/
Stock Drop: शेअर बाजार पॅनिक, स्वस्तात मिळाले म्हणून 1661 कोटीचे शेअर्स घेतले, बसला मोठा तडाखा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल