पुण्याचा इंजिनियर VIP ग्रुपचा मेंबर झाला, रोज रात्री व्हायचा क्लास; एका महिन्यानंतर पायाखालची जमीन सरकली

Last Updated:

Online Share Trading Fraud: पुण्यात ऑनलाईन ट्रेडिंगमधून मोठा नफा कमावण्याच्या आशेने एका सिव्हिल इंजिनियरची 1.32 कोटींना फसवणुक झाली आहे. रात्रीच्या ऑनलाइन लेक्चर्स, व्हीआयपी ग्रुप आणि बनावट शेअर ट्रेडिंग अॅपच्या माध्यमातून त्याला गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले. शेवटी पैसे काढण्याच्या प्रयत्नात असताना त्याला फसवणुकीची जाणीव झाली.

News18
News18
पुणे: गेल्या पाच महिन्यांपासून घसरणाऱ्या सेन्सेक्स आणि निफ्टीमुळे अनेक छोट्या आणि मोठ्या गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारातून अनेक लोक बाहेर देखील पडले आहेत. शेअर बाजारातील पडझडीत झालेले नुकसान कमी की काय आता अधिक नफा मिळून देण्याच्या अमिषाने गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केली जात आहे. पुण्यात अशा प्रकारचा एक ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा समोर आला आहे. ज्यात एका व्यक्तीची तब्बल 1.32 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
बनावट शेअर ट्रेडिंग अॅप, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि खोट्या तज्ज्ञांकडून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून अनेकांची मोठ्या प्रमाणात फसवणू्क होत आहे. पुण्यासारख्या शहरात अशा प्रकारे फसवणूक होण्याचे प्रमाण जास्त आहे. पुण्यातील कोथरूडमधील 53 वर्षीय सिव्हिल इंजिनियरची 1.32 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून त्यांना या जाळ्यात अडकवण्यात आले होते.
advertisement
अशी झाली फसवणुकीची सुरुवात
सुमारे दोन महिन्यांपूर्वी फिर्यादीला सोशल मीडियावर एका ऑनलाइन शेअर ट्रेडिंग संबंधित जाहिरातीची लिंक दिसली. त्याने त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आयाना नावाच्या महिलेच्या प्रोफाइलमधून त्याला मेसेज आला. त्यानंतर तिने त्याला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. ज्यात एका मोठ्या भारतीय वित्तीय संस्थेचे नाव वापरण्यात आले होते.
advertisement
या ग्रुपमध्ये अॅड केल्यानंतर त्याला एक ऑनलाइन फॉर्म भरायला सांगण्यात आला. जिथे त्याने गुंतवणुकीसाठी रकमेची माहिती दिली. काही वेळानंतर त्याला कळवण्यात आले की त्याची निवड झाली आहे आणि तो आता ‘VIP’ ग्रुपचा सदस्य आहे. त्यानंतर त्याला रोज रात्री ऑनलाइन लेक्चर्समध्ये भाग घ्यायला सांगण्यात आले. ज्या लेक्चर्समध्ये शेअर ट्रेडिंगच्या यशस्वी फॉर्म्युलाबद्दल मार्गदर्शन केलं जात होतं.
advertisement
बनावट अॅपद्वारे मोठ्या नफ्याचे आमि
या लेक्चर्सदरम्यान ग्रुपमधील मॅनेजरकडून त्याला एका बनावट शेअर ट्रेडिंग अॅपची लिंक पाठवली. जिथे तो गुंतवणूक करू शकत होता. सुरुवातीला त्याला काही लहान रकमेची गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. त्याला मोबाईलवरील अॅपमधून चांगले रिटर्न मिळू लागले. हा नफा पाहून त्याचा विश्वास वाढला आणि मोठी रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसांत ग्रुपमधील प्रशासकांनी त्याला मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवण्यास सांगितले. इतकेच नाही तर त्यासाठी कर्ज घेण्यास देखील भाग पाडले. जास्त नफा होईल म्हणून त्याने तब्बल 45 लाखांचे कर्ज घेऊन गुंतवणूक सुरूच ठेवली.
advertisement
1.32 कोटींचे नुकसान
डिसेंबर 2023च्या शेवटच्या आठवड्यापासून ते जानेवारी 2024च्या अखेरपर्यंत त्याने एकूण 16 वेळा व्यवहार करून 1.32 कोटी रुपये पाठवले. या बनावट अॅपवर त्याला 30.6 कोटी रुपयांचा नफा मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे त्याला अधिक पैसे गुंतवण्यास भाग पाडले गेले.
advertisement
पैसे काढण्यास गेला अन् पाया खालची जमीन सरकली
अखेरीस फिर्यादीने जेव्हा 80 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला मोठी प्रोसेसिंग फी भरण्यास सांगण्यात आले. त्याने या विषयी चौकशी सुरू केली असता, ग्रुपमधील सर्व मॅनेजर अचानक गायब झाल्याचे दिसले आणि संपर्क देखील होत नव्हता. आपली फसवणुक झाल्याचे कळाल्यानंतर त्याने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
advertisement
पुण्यात शेअर ट्रेडिंग घोटाळ्यांची मोठी लाट
पुणे आणि पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी गेल्या एका वर्षात अशा ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळ्यांचे शेकडो प्रकरणे नोंदवली आहेत. 2024 मध्येच 128 प्रकरणे समोर आली असून एकूण 143 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. ही संख्या 50 लाखांपेक्षा कमी रकमेची फसवणूक झालेल्या तक्रारींचा समावेश न करता आहे. त्यामुळे हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/मनी/
पुण्याचा इंजिनियर VIP ग्रुपचा मेंबर झाला, रोज रात्री व्हायचा क्लास; एका महिन्यानंतर पायाखालची जमीन सरकली
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement