Mumbai Property Deal: मुंबईच्या प्रॉपर्टी बाजारात खळबळ! अख्ख्या इमारतीची खरेदी, 12 अल्ट्रा-लक्झरी फ्लॅट्ससाठी इतके कोटी मोजले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mumbai Real Estate Deal: उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबाने मुंबईच्या वरळी सी-फेस भागातील एक संपूर्ण आलिशान इमारत तब्बल 202 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. या इमारतीत 12 लक्झरी फ्लॅट्स असून हा सौदा मुंबईतील सर्वात महागड्या प्रॉपर्टी व्यवहारांपैकी एक मानला जातो.
मुंबई: मुंबईत गेल्या काही महिन्यात अनेक मोठे प्रॉपर्टीचे व्यवहार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. काही प्रॉपर्टी या उद्योजकांनी तर काही सिनेस्टार आणि कलाकारांनी खरेदी केल्या आहेत. आता मुंबई असाच एक मोठा खरेदी व्यवहार झाला आहे. कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि CEO उदय कोटक यांनी आपल्या कुटुंबासह मुंबईच्या वरळी सी-फेस भागातील एक संपूर्ण इमारत खरेदी केली आहे. या इमारतीत 12 अल्ट्रा-लक्झरी फ्लॅट्स असून हा व्यवहार तब्बल 202 कोटी रुपयांचा आहे. मुंबईतील सर्वाधिक महागड्या प्रॉपर्टी सौद्यांपैकी हा एक मानला जात आहे.
वरळी सी-फेस: लक्झरी आणि महागड्या प्रॉपर्टीचे केंद्र
वरळी हा मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक आहे आणि समुद्रकिनारी असलेल्या इमारतींना विशेष मागणी असते. याच कारणामुळे कोटक कुटुंबाने या 3 मजली इमारतीतील 12 फ्लॅट्स विकत घेण्यासाठी मोठी गुंतवणूक केली.
advertisement
प्रति चौरस फूट दरात नवा विक्रम
इकोनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, या व्यवहारातील प्रति चौरस फूट दर 2.71 लाख रुपये इतका आहे. जो या भागातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. यापूर्वी अल्टामाउंट रोड आणि भूलाभाई देसाई रोड येथे अनुक्रमे 2.25 लाख आणि 2.09 लाख रुपये प्रति चौरस फूट असा विक्रमी दर नोंदवला गेला होता.
advertisement
खरेदी जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये पूर्ण
जमिनीच्या दस्तऐवजांनुसार या इमारतीशी संबंधित बहुतांश व्यवहार 30 जानेवारी 2024 रोजी रजिस्टर झाले. तर अंतिम व्यवहार 5 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण झाला. या सौद्यामुळे भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे बोलले जात आहे.
‘शॅम्पेन हाऊस’च्या शेजारी नवी प्रॉपर्टी
ही नवी खरेदी '19 शिव सागर' इमारतीसाठी झाली असून ती शॅम्पेन हाऊसच्या शेजारी आहे. याच शॅम्पेन हाऊसला कोटक कुटुंबाने 2018 मध्ये 385 कोटी रुपयांना विकत घेतले होते. या नवीन संपत्तीमुळे उदय कोटक यांचा समुद्रकिनारी असलेल्या लक्झरी प्रॉपर्टीवर ताबा मिळाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 02, 2025 3:39 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Mumbai Property Deal: मुंबईच्या प्रॉपर्टी बाजारात खळबळ! अख्ख्या इमारतीची खरेदी, 12 अल्ट्रा-लक्झरी फ्लॅट्ससाठी इतके कोटी मोजले