Cheapest Gold: या पाच ठिकाणाहून सोने खरेदी करा, थेट ८ ते १५ हजार रुपये वाचतील

Last Updated:
Cheapest Gold:सोने खरेदी करण्याचा विचार करताय? भारतात सोन्याचे दर 90,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेले असले तरी काही देशांत अजूनही ते स्वस्तात मिळत आहे. जाणून घ्या कोणत्या देशांत तुम्ही हजारोंची बचत करून सोने खरेदी करू शकता!
1/8
गेल्या काही दिवसांपासून भारतीय सोन्याच्या बाजारात मोठी उसळी दिसून आली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 89,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला असून, लवकरच तो 90,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे. ऑल इंडिया सर्राफा असोसिएशनच्या अहवालानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढीमुळे भारतीय बाजारातही किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करायचे असेल, तर परदेशातून खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

advertisement
2/8
सोन्याचे स्वस्त ठिकाण: भारतीयांच्या दृष्टीने सर्वात स्वस्त सोने खरेदी करण्याचे ठिकाण म्हणजे यूएई (दुबई). येथे भारताच्या तुलनेत सोने 10-15% स्वस्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे दुबईमध्ये वॅट आणि आयात शुल्क अत्यंत कमी आहे. येथे सोन्याची किंमत कमी असल्याने 10 ग्रॅमसाठी 14-15 हजार रुपयांची बचत होऊ शकते. त्यामुळे अनेक भारतीय दुबईला जाऊन सोने खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

3/8
स्वस्त आणि आकर्षक दागिने: थायलंडही स्वस्त सोने खरेदीसाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः बँकॉक आणि पटाया येथे सोने तुलनेने स्वस्त मिळते. येथे सोन्यावर लागणाऱ्या करांचे प्रमाण भारताच्या तुलनेत कमी आहे. तसेच, मेकिंग चार्जेसही कमी असल्याने भारतीय ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय ठरतो. थायलंडमध्ये सोन्याच्या किंमती भारताच्या तुलनेत 5-10% कमी असतात. म्हणजेच, 8-9 हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

4/8
कमी कर आणि अधिक बचत: दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भारतीय मलेशियाला प्रवास करतात आणि अनेक जण तिथून सोने खरेदी करतात. कारण येथे सोने 5-10% स्वस्त आहे. कमी आयात शुल्क आणि कमी मेकिंग चार्ज यामुळे येथे 10 ग्रॅमसाठी 8-9 हजार रुपयांची बचत करता येऊ शकते.

5/8
गुंतवणुकीसाठी उत्तम ठिकाण: सिंगापूरमध्ये सोने खरेदी करण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे येथे गुंतवणूक-ग्रेड सोन्यावर जीएसटी नाही. त्यामुळे येथे सोन्याच्या किंमती तुलनेने कमी असतात. भारताच्या तुलनेत येथे सोने 5-8% स्वस्त आहे, ज्यामुळे 10 ग्रॅमसाठी 6-7 हजार रुपयांची बचत होऊ शकते.

6/8
करमुक्त सोने खरेदीचा उत्तम पर्याय: हाँगकाँगमध्ये सोन्यावर कोणताही कर लागत नाही, त्यामुळे येथे सोन्याच्या किंमती अत्यंत स्पर्धात्मक असतात. येथेही सोने भारताच्या तुलनेत 5-10% स्वस्त आहे. यामुळे 8-9 हजार रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

7/8
परदेशातून सोने आणताना काय लक्षात ठेवावे: भारतीय कायद्यानुसार प्रवासी पुरुषांसाठी 20 ग्रॅम आणि महिलांसाठी 40 ग्रॅम सोने देशात करमुक्त आणू शकतात.त्यापेक्षा अधिक प्रमाणात सोने आणायचे असल्यास शुल्क भरावे लागेल. त्यामुळे स्वस्त सोने खरेदी करताना या मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे.

8/8
भारतातील वाढत्या किंमती पाहता,परदेशातून सोने खरेदी हा एक फायदेशीर पर्याय: सोन्याच्या वाढत्या दरामुळे भारतीय ग्राहक आणि गुंतवणूकदार परदेशातून सोने खरेदी करण्याकडे अधिक कल दर्शवू शकतात. विशेषतः यूएई, सिंगापूर, थायलंड, मलेशिया आणि हाँग काँग ही ठिकाणे स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. त्यामुळे तुम्ही नवीन दागिने खरेदी करण्याचा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर परदेशातील पर्यायांचा विचार नक्की करा!

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement