अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. सोमवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 80502 अंकावर होता. तर मंगळवारी सुरुवातीला उसळी घेत 80724 अंकापर्यंत पोहोचला. पण नंतर तो 80355 पर्यंत खाली आला. केंद्र सरकार अर्थसंकल्पात काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अर्थमंत्री सीतारमण यांच्या पोतडीतून शेतकरी, महिला, रोजगार यांच्यासाठी घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्योग, सेवा, आयटी या क्षेत्रासाठी केंद्र सरकार कोणत्या तरतुदी करणार? कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद असेल यानुसार शेअर बाजारात चढउतार होऊ शकतो.
advertisement
सोमवारी शेअर बाजारात काय झालं?
बाजारात लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार होताना दिसतायत. अर्थसंकल्प सादर होण्याआधी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. शुक्रवारीसुद्धा बाजारात घसरण झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.