Food Delivery Apps Charges Smart Hack: स्विगी आणि झोमॅटो सारखे फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आता पूर्वीपेक्षा जास्त महागडे ठरत आहेत. नवीन जीएसटी नियमांमुळे आणि वाढत्या प्लॅटफॉर्म शुल्कामुळे, ग्राहकांना अनेकदा जेवणाच्या वास्तविक किमतीपेक्षा या अतिरिक्त शुल्काचा भार अधिक वाटू लागला आहे. ग्राहकांकडून सोशल मीडियावर त्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. खिशावर अधिकचा भार न पडता फूड डिलिव्हरीसाठी वेगवेगळे पर्याय ग्राहकांकडून पाहिले जात आहेत.
advertisement
फूड डिलिव्हरी अॅपवर जेवण महाग का?
फूड डिलिव्हरी अॅप्सवरील बिल खूप जास्त असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या बिलमध्ये, रेस्टॉरंट जीएसटी, पॅकेजिंग शुल्क, प्लॅटफॉर्म शुल्क आणि विविध शुल्क समाविष्ट आहेत. त्याशिवाय रेस्टोरंट्स ठाराविक अंतरापलिकडे असेल तर अधिकचे शुल्क आकारले जाते. अलीकडेच, एका ग्राहकाने सोशल मीडियावर त्याचे बिल शेअर केले, ज्यामध्ये रेस्टॉरंट जीएसटी 14.75 रुपये, वितरण शुल्क 25 रुपये (अधिक 4.5 रुपये जीएसटी), पॅकेजिंगचे 20 रुपये आणि प्लॅटफॉर्म शुल्क 14.99 रुपये समाविष्ट होते. याचा अर्थ असा की जर जेवणाची किंमत 200 रुपये असेल तर अंतिम बिल 300 रुपयापर्यंत पोहोचू शकते.
महिलेचा स्मार्ट हॅक, डिलिव्हरी चार्जची कटकट संपवली...
एका महिलेने फूड डिलिव्हरी अॅपच्या डिलिव्हरी चार्जची कटकट संपवण्यासाठी एक स्मार्ट मार्ग शोधला आहे. तिची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने सांगितले की, फूड डिलिव्हरी अॅपचे चार्ज अनेकदा महागात पडले आहेत. त्यामुळे आता स्विगी आणि झोमॅटो वापरणं पूर्णपणे बंद केले आहे. फूड डिलिव्हरीसाठी ती थेट आवडत्या रेस्टॉरंट्सना थेट कॉल करते आणि ते तिच्या घरी पोहोचवण्यासाठी उबर कुरियर किंवा रॅपिडो सारख्या सेवा वापरते.
तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ती आता झोमॅटो किंवा स्विगी वापरत नाही. ती उबर किंवा रॅपिडोद्वारे घरी फूड ऑर्डर करते. महिलेच्या मते, या सेवांवरील डिलिव्हरी शुल्क 50 ते 100 रुपयांपर्यंत आहे. स्विगी आणि झोमॅटोने आकारलेल्या मोठ्या कमिशन, प्लॅटफॉर्म शुल्क आणि जीएसटी शुल्काची तुलना केल्यास हे स्वस्त पडत असल्याचे महिलेने सांगितले.
इंटरनेटवर फूल सपोर्ट...
ही पोस्ट आतापर्यंत 3,00,000 पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे. नेटिझन्सकडून या महिलेच्या स्मार्ट हॅकचं कौतुक केलं आहे. एकाने म्हटले की, "बरोबर आहे, झोमॅटो आणि स्विगीकडे 40-50 टक्के मार्कअप आहे. जर ऑर्डर 300 रुपयांची असेल तर प्रत्यक्ष किंमत 40-50% कमी असेल. अशा परिस्थितीत, रॅपिडो किंवा पोर्टरवरून ऑर्डर करणे खूपच स्वस्त आहे." दुसऱ्याने म्हटले की त्यांनी ही पद्धत वापरून पाहिली आणि त्यामुळे खरोखरच खर्च कमी झाला.