टॅक्स सेव्हिंग बँक एफडी म्हणजे काय आणि कोणत्या बँकांमध्ये ही सुविधा दिली जात आहे? अशा एफडींवर बँका किती व्याज देत आहेत? या बाबत सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे.
टॅक्स सेव्हिंग बँक एफडी म्हणजे काय?
टॅक्स सेव्हिंग बँक फिक्स्ड डिपॉझिटवर आयकर कायद्यातील कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळतो. ही बँक एफडी पाच वर्षांसाठी असते. पाच वर्षांच्या लॉक-इन कालावधीत त्यातून पैसे काढता येत नाहीत. यामध्ये पैशाच्या सुरक्षिततेसह परताव्याची हमी दिली जाते. भारतीय रिझर्व्ह बँकेची (आयबीआय) उपकंपनी असलेल्या डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआईसीजीसी) अंतर्गत बँकांकडील टॅक्स सेव्हिंग बँक एफडी सुविधा चालवली जाते. यामध्ये बँक आणि गुंतवणुकदाराची पाच लाख रुपयांची रक्कम कव्हर केली जाते.
advertisement
टॅक्स सेव्हिंग बँक एफडीवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जातो. हा याचा सर्वात मोठा तोटा आहे. एफडी गुंतवणुकदारांनी पाच वर्षांच्या करसवलतीचा पर्याय निवडला आणि त्यांचा टीडीएस कापला गेला तरीही त्यांना कर भरावा लागू शकतो. एफडीमधून मिळणारं व्याज गुंतवणुकदाराच्या वार्षिक उत्पन्नात समाविष्ट केलं जातं आणि नंतर आयकर स्लॅबनुसार त्यावर कर लागू केला जातो. तसेच, बहुतेक बँका नियमित एफडीवर कर्ज देतात पण, टॅक्स सेव्हिंग बँक एफडीमध्ये तुम्हाला ही सुविधा मिळत नाही.
टॅक्स सेव्हिंग बँक एफडीच्या माध्यमातून किती कर वाचवता येतो?
टॅक्स सेव्हिंग बँक एफडीमध्ये, गुंतवणुकदाराला पीपीएफ, होम लोनमधील मुद्दलाची परतफेड, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम इत्यादीसारख्या इतर बचत योजनांवर कर सूट मिळते. पाच वर्षांच्या टॅक्स सेव्हिंग एफडीवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर सवलतीसाठी दावा केला जाऊ शकतो.
देशातील 10 मोठ्या बँकांमधील एफडी स्कीम आणि व्याजदर
एचडीएफसी बँक: एचडीएफसी बँक सामान्य एफडीवर वार्षिक सात टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 7.5 टक्के दराने व्याज मिळतं.
आयसीआयसीआय बँक: आयसीआयसीआय बँकेतील एफडीवर साडेसात टक्के दराने व्याज मिळते.
स्टेट बँक ऑफ इंडिया: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयमध्ये सामान्य एफडीवर 6.5 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 7.5 टक्के व्याज मिळते.
कोटक महिंद्रा बँक: कोटक महिंद्रा बँक सामान्य व्यक्तींना सात दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी स्कीम ऑफर करते. या बँकेतील एफडीवर 6.2 ते 6.7 टक्के व्याजदर मिळत आहे.
अॅक्सिस बँक: ॲक्सिस बँक सामान्य एफडीवर सात टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर सर्वाधिक 7.75 टक्के व्याज देत आहे. या बँकेत पाच ते 10 वर्षांसाठी एफडी करता येते.
इंडसइंड बँक: इंडसइंड बँक सामान्य एफडीवर 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या नावे असलेल्या एफडीवर वार्षिक 7.75 टक्के दराने व्याज मिळत आहे.
बँक ऑफ बडोदा: बँक ऑफ बडोदामध्ये एफडीवर वार्षिक 6.5 आणि 7.15 टक्के दराने व्याज मिळतें.
पंजाब नॅशनल बँक: पंजाब नॅशनल बँकेतील एफडीचे दरही इतर खासगी बँकांपेक्षा कमी आहेत. तिथे सामान्य एफडीवर 6.5 टक्के व्याज दिलं जात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर सात टक्के व्याज दिलं जात आहे.