TRENDING:

Tax Saving idea for Womens: दमदार रिटर्न आणि टॅक्समध्येही सूट, महिलांसाठी बेस्ट 4 योजना

Last Updated:

आयकर अधिनियमाच्या कलम 80 सीनुसार करसवलत मिळते. ही एक फिक्स्ड इन्कम स्कीम आहे. यात कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणणुकीला सुरुवात करता येते.

advertisement
टॅक्स प्लॅनिंग ही गोष्ट जितकी नोकरदार पुरुषांसाठी महत्त्वाची असते, तितकीच नोकरदार महिलांसाठीही. आर्थिक वर्षातले अखेरचे अडीच महिने राहिल्यामुळे करबचतीसाठीच्या नियोजनाला वेग आला आहे. वर्किंग वूमन्सना करबचतीसाठी कोणते पर्याय चांगले ठरू शकतात, याची माहिती घेऊ या. 'इंडिया टीव्ही'ने याबद्दल माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
News18
News18
advertisement

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट

वर्किंग वूमन्स पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर आयकर अधिनियमाच्या कलम 80 सीनुसार करसवलत मिळते. ही एक फिक्स्ड इन्कम स्कीम आहे. यात कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणणुकीला सुरुवात करता येते. सध्या या योजनेत 7.7 टक्के दराने व्याज दिलं जात आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात केलेल्या बचतीवर करसवलतीचा दावा करता येतो. त्याची जास्तीत जास्त मर्यादा दीड लाख रुपये आहे.

advertisement

सुकन्या समृद्धी योजना

वर्किंग वूमन्सना करबचत करण्यासाठी ही योजनादेखील चांगली आहे. सरकारचं पाठबळ असलेली ही योजना खास मुलींसाठी डिझाइन करण्यात आलेली आहे. आई-वडील आपल्या मुलीसाठी या योजनेअंतर्गत बचत करू शकतात. सुकन्या समृद्धी योजना ही EEE अशा टॅक्स कॅटेगरीत येते. म्हणजेच यात गुंतवणूक, उत्पन्न किंवा यातून काढलेल्या पैशांवर कर द्यावा लागत नाही. आपल्याला मुलगी असेल, तर ही योजना नक्कीच फायद्याची ठरते. आयकर अधिनियम 1961च्या कलम 10 (11ए) अंतर्गत करसवलत दिली जाते आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक कलम 80 सीअंतर्गत कपातीस पात्र आहे. त्याची जास्तीत जास्त मर्यादा दीड लाख रुपये आहे. सध्या या योजनेतला व्याजदर 8.20 टक्के आहे.

advertisement

इन्शुरन्स पॉलिसी

महिला स्वतःच्या, तसंच जोडीदाराच्या आणि मुलांच्या जीवन विमा पॉलिसीवर करसवलतीचा लाभ घेऊ शकतात. आयकर अधिनियमाच्या कलम 80 यू अंतर्गत कपात सामान्य व्यक्तीसाठी विमा रकमेच्या 10 टक्के आणि काही ठरावीक आजाराच्या व्यक्तींसाठी 15 टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही. विमा हा सुरक्षात्मक उपाय आहे आणि स्मार्ट टॅक्स सेव्हिंग साधनही आहे. करपात्र उत्पन्नातून 25 हजार रुपयांपर्यंतचा विमा प्रीमिअम करकपातीस पात्र आहे. ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई-वडिलांच्या आरोग्य विम्यासाठीच्या प्रीमिअमसाठी 30 हजार रुपयांपर्यंतची अतिरिक्त कपात क्लेम करता येते. त्यामुळे अधिक टॅक्स वाचवण्यास मदत होते.

advertisement

पीपीएफ

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हा एक चांगला पर्याय आहे. आयकर अधिनियम कलम 80 सीनुसार करसवलतीचा फायदा मिळतो. यात 15 वर्षांचा लॉक इन पीरियड असतो. कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये दर वर्षी गुंतवता येतात. सध्या वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज मिळत आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी, चांगल्या परताव्यासाठी आणि करबचतीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Tax Saving idea for Womens: दमदार रिटर्न आणि टॅक्समध्येही सूट, महिलांसाठी बेस्ट 4 योजना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल