ही फॅक्टरी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पक्षाच्या (टीडीपी) सरकारच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आली होती. तेव्हापासून येथे सातत्याने वाहनांचे उत्पादन सुरू आहे. मुख्य उत्पादन केंद्रासोबतच या प्रकल्पात विविध ऑटो पार्ट्स तयार करणाऱ्या सहाय्यक युनिट्सही आहेत. हे पार्ट्स नंतर मुख्य युनिटकडे हलवले जातात आणि तिथे गाड्यांचे अंतिम असेंब्ली काम होते.
advertisement
19 मार्च रोजी कंपनीने इंजिन गायब असल्याचे लक्षात घेतले. मात्र सुरुवातीला त्यांनी केवळ पोलिसांच्या मदतीने खाजगी चौकशी करण्याचा प्रयत्न केला. त्यामागे कंपनीची प्रतिमा मलिन होण्याची भीती होती. तथापि पोलिसांनी अधिकृत तक्रारशिवाय चौकशीस नकार दिला. त्यामुळे कंपनीने नंतर औपचारिक तक्रार दाखल केली.
पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासणीत असे संकेत मिळाले आहेत की या चोरीमध्ये कंपनीचे काही माजी कर्मचारी सामील असू शकतात. या व्यक्तींना प्रकल्पातील अंतर्गत कार्यपद्धती, शेड्युल आणि वाहतुकीची माहिती होती. त्यामुळे चोरी अचूकपणे राबवता आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.
सध्या पोलिसांनी या माजी कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला असून, तपास चालू आहे. याप्रकरणी लवकरच अधिकृत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. ही घटना केवळ किया मोटर्ससाठीच नव्हे, तर संपूर्ण ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी एक धक्का मानला जात आहे. कारण अशा प्रकारच्या चोरीमुळे कंपन्यांच्या लॉजिस्टिक आणि अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो.
