पुणे : अनेक पिढ्यांपासून परंपरेने चालत आलेले व्यवसाय तुम्ही पाहिले असतील. आज आपण अशाच तब्बल 116 वर्षांची परंपरा असलेल्या पुण्यातील एका व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. पुण्यातील भाजी मंडई इथे असलेलं युनिव्हर्सल सिड्स नावाने पारेख यांनी 1908 साली आपला हा शेती गार्डनिंगचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांची सहावी पिढी हा व्यवसाय करत आहे. जवळपास 116 वर्ष जुना असलेल्या या व्यवसायातून वर्षाला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
advertisement
या व्यवसायाचे बालचंद पारेख यांच्याशी लोकल18च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, माझे पणजोबा शर्मल पारेख यांनी या व्यवसायाची 1908 साली पुण्यातील मंडई इथे सुरुवात केली. आता आमची सहावी पिढी हा व्यवसाय करत आहे. वाढती लोकसंख्या आणि जागेअभावी अनेकांना शेती करणं शक्य होत नाही तर त्यातून तयार होणारा भाजीपाला पुरत नाही.
शेकडो एकर नव्हे तर फक्त 18 गुंठ्यातून शेतकरी कमावतोय लाखो रुपये, काय हा फॉर्म्यूला?
तसेच शेतीतून तयार होणारा माल आपल्यापर्यंत यायला तीन ते चार दिवस हे जातात तसेच तो माल रासायनिक असतो किंवा त्याची चव गेलेली असते. त्यामुळे तीच ताजी चव आणि ऑरगॅनिक खायला मिळावे, म्हणून ही संकल्पना सुरू केली आहे. यामध्ये 100 प्रकारच्या बिया आणि झाडामध्ये हजार प्रकार उपलब्ध आहेत. अगदी 5 रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत हे दर आहेत आणि या व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल ही 1 कोटीपर्यंत होते.
मॅक्रो न्यट्रिलायझर खते, ऑरगॅनिक कीटकनाशके, पेस्टीसाईटस, गार्डनसाठी तयार रोपे, गार्डन सॉईल आणि बागकामाचे साहित्य याठिकाणी मिळते. तसेच ते इतरांना याबाबत मार्गदर्शनही करतात, अशी माहिती बालचंद पारेख यांनी दिली आहे. या कामातून आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो, अशा भावना देखील पारेख यांनी व्यक्त केल्या.