TRENDING:

UPI पेमेंट अडकले तर काय कराल? जाणून घ्या पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया

Last Updated:

कधीकधी असं होतं की अकाउंटमधून पैसे तर कटतात पण समोरच्या व्यक्तीला पोहोचत नाहीत. अशा वेळी अनेक जण गोंधळून जातात आणि लगेचच पुन्हा पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते.

advertisement
मुंबई : आजच्या डिजिटल युगात UPI पेमेंट हा सर्वात लोकप्रिय व्यवहाराचा मार्ग बनला आहे. छोट्या मोठ्या खरेदीपासून बिल भरण्यापर्यंत जवळपास प्रत्येक जण UPI चा वापर करताना दिसतो. मात्र, कधी कधी या व्यवहारात अडचणीही येतात. सर्वात सामान्य समस्या म्हणजे, कधीकधी असं होतं की अकाउंटमधून पैसे तर कटतात पण समोरच्या व्यक्तीला पोहोचत नाहीत. अशा वेळी अनेक जण गोंधळून जातात आणि लगेचच पुन्हा पेमेंट करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

का अडकतो व्यवहार?

UPI ट्रांजॅक्शन फेल होण्यामागे बहुतेक वेळा सर्व्हरवर जास्त लोड किंवा नेटवर्कची समस्या कारणीभूत असते. या परिस्थितीत अकाउंटमधून पैसे डेबिट होतात, पण समोरच्या खात्यात क्रेडिट होत नाहीत. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे त्वरित घाबरू नये आणि पुन्हा ट्रांजॅक्शन करण्याऐवजी थोडा वेळ थांबावे.

24 तासांत पैसे परत

बहुतेक प्रकरणांत अशा प्रकारे कट झालेले पैसे काही वेळातच आपल्या खात्यात परत येतात. मात्र, काही वेळा या प्रक्रियेला 24 तास लागू शकतात. क्वचितच काही प्रकरणांमध्ये जास्त वेळ लागतो, पण शेवटी पैसे परत मिळतातच.

advertisement

अ‍ॅपमध्ये नोंदवा तक्रार

जर आपण PhonePe, Google Pay, Paytm, BHIM किंवा इतर कोणतेही UPI अ‍ॅप वापरत असाल, तर त्यामध्ये दिलेल्या Help/Support सेक्शनमध्ये तक्रार नोंदवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर 24 ते 72 तासांत तोडगा मिळतो. पण जर व्यवहार अजूनही पेंडिंग असेल तर त्याच्या पूर्ण होण्याची वाट पाहणे गरजेचे आहे.

एकदा व्यवहाराचा स्टेटस "सक्सेसफुल" किंवा "फेल्ड" झाला कीच पुढील कारवाई करा. जर अ‍ॅपवर तक्रार नोंदवूनही पैसे परत मिळाले नाहीत, तर तुम्ही ट्रांजॅक्शन नंबरसह बँकेत तक्रार करू शकता. बँक संपूर्ण तपासणी करून 30 दिवसांच्या आत तुमचे पैसे परत करणे बंधनकारक आहे.

advertisement

जर बँक योग्य कारणाशिवाय पैसे परत करत नसेल, तर तुम्ही थेट RBI (भारतीय रिझर्व्ह बँक) कडे तक्रार करू शकता.

मराठी बातम्या/मनी/
UPI पेमेंट अडकले तर काय कराल? जाणून घ्या पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल