TRENDING:

Kumbh Mela Economic: कुंभमेळ्याचं चक्रावून टाकणारं आर्थिक गणित, एका व्यक्तीने ५ हजार खर्च केले तरी मिळणार...

Last Updated:

Kumbh Mela Economic Growth: प्रयागराज येथे सुरू झालेल्या महाकुंभ मेळ्यासाठी 40 कोटींपेक्षा अधिक भक्त येण्याची शक्यता आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 7 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. पण यामुळे राज्य सरकारचा आर्थिक भरभराट होणार आहे.

advertisement
प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आजपासून महाकुंभ मेळा 2025 ची सुरुवात झाली आहे. संपूर्ण जगाचे आकर्षण ठरलेल्या या मेळ्यात कोट्यवधी भक्त संगमाच्या पवित्र जलात स्नान करण्यासाठी येत आहेत. संगम हे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचे संगमस्थान आहे. कुंभ मेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा मानला जातो. यावेळी 144 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग घडत असल्यामुळे हा महाकुंभ अधिक खास बनला आहे.
News18
News18
advertisement

यावर्षीच्या महाकुंभ मेळ्यात 40 कोटींपेक्षा जास्त भक्त येतील अशी अपेक्षा आहे. ही संख्या अमेरिका आणि रशियाच्या या दोन देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. या महाकुंभाच्या आयोजनासाठी उत्तर प्रदेश सरकारने सुमारे 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट मंजूर केले आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा महाकुंभ मेळा उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेसाठीही बुस्टर ठरणार आहे. यामुळे उत्तर प्रदेशाच्या सरकारी तिजोरीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

advertisement

शेअर बाजारात 14 लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा आला

महाकुंभातून 2 लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा अंदाज

आर्थिक तज्ज्ञांच्या मते महाकुंभ मेळा 2025 उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी रुपयांपर्यंत फायदा शकतो. महाकुंभमध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताने सरासरी 5,000 रुपये खर्च केले तर या मेळ्यातून एकूण 2 लाख कोटी रुपयांची कमाई होईल असा अंदाज आहे. काही अंदाजानुसार, प्रति व्यक्ती खर्च 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. ज्यामुळे एकूण आर्थिक उलाढाल 4 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. यामुळे राज्याच्या जीडीपीत 1% पेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा आहे.

advertisement

जगातील एकमेव फलंदाज जो कधीच शून्यावर बाद झाला नाही, ३० वर्ष झाली हा विक्रम कायम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीकडेच सांगितले की 2019 मध्ये प्रयागराज येथे झालेल्या अर्धकुंभ मेळ्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेत 1.2 लाख कोटी रुपयांचे योगदान झाले होते. यावेळी महाकुंभ मेळ्यात 40 कोटी भक्त येतील अशी अपेक्षा आहे. ज्यामुळे राज्याचा आर्थिक विकास होण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

advertisement

टी-20 क्रिकेटमध्ये तांडव! 52 चेंडूत गोलंदाजांची पिसे काढली, 10 षटकारांसह केल्या

वेगवेगळ्या व्यवसायांतून होणारे उत्पन्न

खाद्यपदार्थ व्यवसाय: अखिल भारतीय व्यापारी परिसंघाच्या (CAIT) मते- पॅकेज्ड खाद्यपदार्थ, पाणी, बिस्किटे, ज्यूस आणि इतर खाद्यपदार्थांमधून सुमारे 20,000 कोटी रुपयांचे उत्पन्न होऊ शकते.

धार्मिक उत्पादने: धार्मिक वस्त्र, तेल, दीप, गंगाजल, मूर्ती, अगरबत्ती आणि धार्मिक पुस्तके यांसारख्या उत्पादने आणि प्रसादातूनही 20,000 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते.

advertisement

वाहतूक: स्थानिक व आंतरराज्य सेवा, मालवाहतूक, आणि टॅक्सी सेवांमधून 10,000 कोटी रुपयांचे योगदान अपेक्षित आहे.

पर्यटन सेवा: टूर गाइड आणि प्रवास पॅकेजांमधून 10,000 कोटी रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय उत्पादने: तात्पुरत्या वैद्यकीय तळांमधून, आयुर्वेदिक उत्पादने आणि औषधांमधून 3,000 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

डिजिटल सेवा: ई-तिकिटिंग, डिजिटल पेमेंट, आणि मोबाइल चार्जिंग स्टेशन यांसारख्या क्षेत्रांतून 1,000 कोटी रुपयांचे योगदान होऊ शकते.

मनोरंजन व जाहिरात: मनोरंजन, जाहिरात आणि प्रचार कार्यक्रमांमधून 10,000 कोटी रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे.

महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. 1,50,000 तंबू, 3,000 स्वयंपाकगृहे, 1,45,000 शौचालये, आणि 100 हून अधिक पार्किंग स्थळे तयार करण्यात आली आहेत. यासाठी 40,000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, जेणेकरून मोठ्या गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन करता येईल.

मराठी बातम्या/मनी/
Kumbh Mela Economic: कुंभमेळ्याचं चक्रावून टाकणारं आर्थिक गणित, एका व्यक्तीने ५ हजार खर्च केले तरी मिळणार...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल