टी-20 क्रिकेटमध्ये तांडव! 52 चेंडूत गोलंदाजांची पिसे काढली, 10 षटकारांसह केल्या इतक्या धावा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Glenn Maxwell Latest News: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत ग्लेन मॅक्सवेलने फक्त ५२ चेंडूत ९० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० षटकार मारले.
मेलबर्न: ऑस्ट्रेलियामध्ये सध्या बिग बॅश लीग 2024-25च्या लढती सुरू आहे. या स्पर्धेतील 32व्या सामन्यात एक वादळी खेळी पहायला मिळाली. ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलने त्याच्या स्फोटक खेळीने गोलंदाजांची बेदम धुलाई केली.
बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळताना मॅक्सवेलने मेलबर्न रेनगेड्सच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याने फक्त 52 चेंडूत 90 धावा केल्या. यात 10 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. मॅक्सवेलने त्याच्या खेळीत 122 मीटर लांब षटकार देखील मारला. हा षटकार पाहून प्रेक्षक हैराण झाले. सोशल मीडियावर त्याच्या या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही मॅच पाहण्यासाठी आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच देखील आला होता.
advertisement
कपिल देवच्या घरी जाऊन त्याच्या डोक्यात गोळ्या घालणार होतो- योगराज सिंग
या सामन्यात मेलबर्न रेनगेड्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मेलबर्न रेनगेड्स गोलंदाजांनी संघाला धमाकेदार सुरूवात करून दिली. फक्त 75 धावांवर त्यांनी 7 विकेट घेतल्या. मेलबर्न रेनगेड्सने मॅच निम्मी जिंकली असे वाटत असताना मॅक्सवेल मैदानात उतरला आणि त्यानंतर त्याने जे काही केले त्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही.
advertisement
जय शहांच्या जागी BCCIमध्ये आले नवे बॉस, कोषाध्यक्ष म्हणून या व्यक्तीची निवड
75 धावांवर 7 विकेट गमवल्यानंतर मेलबर्न स्टार्सने वादळी कमबॅक केले. मॅक्सवेलने संघाला 158 धावांची धावसंख्या उभी करून दिली. तो शतक पूर्ण करेल असे वाटत होते, मात्र केन रिचर्डसन त्याला बोल्ड केले. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर स्टार्सने 165 धावांपर्यंत मजल मारली.
advertisement
122 METRES!
That is monstrous from Glenn Maxwell 🤯 #BBL14 pic.twitter.com/9tc5lJKZtx
— KFC Big Bash League (@BBL) January 12, 2025
ही लढत मेलबर्न स्टार्सने 42 धावांनी जिंकली. विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मेलबर्न रेनगेड्सचा डाव 123 धावांत संपुष्ठात आला. संघ अडचणीत असताना अशा प्रकारची वादळी खेळी करण्याची मॅक्सवेलची ही पहिली वेळ नाही. याआधी ऑस्ट्रेलियासाठी त्याने अशी खेळी केली आहे. भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकप दरम्यान अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत मॅक्सवेलने दुखापत असताना अशीच खेळी करून संघाला विजय मिळून दिला होता. तेव्हा जर ऑस्ट्रेलियाने लढत गमावली असती तर कदाचित ते अंतिम फेरीत पोहोचू शकले नसते आणि त्या परिस्थिती भारताला अंतिम सामन्यात अन्य संघाविरुद्ध लढावे लागले असते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 12, 2025 8:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
टी-20 क्रिकेटमध्ये तांडव! 52 चेंडूत गोलंदाजांची पिसे काढली, 10 षटकारांसह केल्या इतक्या धावा