जय शहांच्या जागी BCCIमध्ये आले नवे बॉस, आशीष शेलार यांच्या जागी कोषाध्यक्ष म्हणून या व्यक्तीची निवड
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
BCCI New Secretary And Treasurer: बीसीसीआयच्या रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण बैठकीत देवजीत सैकिया आणि प्रभतेज सिंह भाटिया यांना बोर्डाचे सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयची रविवारी विशेष सर्वसाधारण बैठक झाली. देवजीत सैकिया आणि प्रभतेज सिंह भाटिया यांना बोर्डाचे सचिव आणि कोषाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी आणि भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी मंगळवारी ही घोषणा दिली. सैकिया आणि प्रभतेज हे दोघेही संबंधित पदासाठी एकमेव उमेदवार होते.
जय शहा यांनी एक डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सैकिया हे बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून काम पाहत होते. बीसीसीआयच्या घटनेनुसार कोणत्याही रिक्तपदावर बैठक बोलवून ४५ दिवसांच्या आत ते पद भरले गेले पाहिजे. रविवार हा या मुदतीचा ४३वा दिवस होता.
फिल्डरचा प्रताप पाहून संघातील खेळाडूंवर तोंड लपवण्याची वेळ, Video
शहा यांच्याआधी आशीष शेलार यांनी कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शेलार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट पदाची शपथ घेतली होती.त्यानंतर त्यांनी बीसीसीआयमधील पद सोडले होते. कोषाध्यक्ष पदासाठी भाटिया यांनी अर्ज दाखल केला होता.
advertisement
बीसीसीआयच्या सर्व साधारण सभेचा मुख्य अजेंडा हा या दोन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा होता. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा हे या बैठकीत विशेष आमंत्रित सदस्य म्हणून भाग घेतील. या बैठकीत अनेक राज्य संघटनेकडून त्यांचा सत्कार केला जाणार आहे. शाह यांनी गेल्या महिन्यात ग्रेग बार्कले यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती.
advertisement
कोण आहेत देवजीत सैकिया
आसामचे देवजीत सैकिया यांनी क्रिकेट, कायदा आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रात काम केले आहे. १९९० ते १९९१ या काळात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४ सामने खेळले होते. या चार सामन्यात त्यांनी ५३ धावा केल्या होत्या. क्रिकेटनंतर त्यांनी कायदे क्षेत्रात काम केले. २८व्या वर्षी त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयात सराव सुरू केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 12, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
जय शहांच्या जागी BCCIमध्ये आले नवे बॉस, आशीष शेलार यांच्या जागी कोषाध्यक्ष म्हणून या व्यक्तीची निवड