Video: कॅच सोडला तरी अंपायरने आऊट दिले; नॉन स्ट्रायकर फलंदाजाचा मूर्खपणा पाहा

Last Updated:

BPL 2025: बांगलादेश प्रीमीयर लीग 2025 मध्ये मोठा ड्रामा झाला. फलंदाजाला त्याची काहीच चूक नसताना अंपायरने बाद दिले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

News18
News18
सिलहट: आयपीएलचा हंगाम अजून दूर आहे. त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमाका होईल. भारतीय संघ सध्या कोणतीही मॅच खेळत नाहीय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध २२ जानेवारीपासून मॅच खेळणार आहे. पण जागतिक क्रिकेटमध्ये अनेक लढती सुरू आहे. बांगलादेशमध्ये सध्या बांगलादेश प्रीमियर लीग सुरू असून या स्पर्धेत झालेला एक ड्रामा संपूर्ण क्रिकेट चाहत्यामध्ये चर्चेत आहे.
BPL 2025मध्ये रंगपूर रायडर्स आणि फॉर्च्यून बारीशाला या दोन संघात लढत सुरू होती. या लढतीत क्रिकेटमध्ये फार दुर्मिळ होणारी एक घटना घडली. रंगपूर संघाकडून खेळणारा फलंदाज महेदी हसनला ऑब्सट्रिक्टिंग द फील्ड आउट देण्यात आले. गंमतीचा भाग म्हणजे त्याने काहीच केले नव्हेत तरी हसनला मैदान सोडण्याची वेळ आली.
ऑस्ट्रेलियामध्ये मला जेवणातून विष देण्यात आले; खेळाडूच्या दाव्याने एकच खळबळ
रंगपूरची फलंदाजी सुरू असताना १९व्या षटकात महेदीने एक क्रॉस शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडूने बॅटच्या वरच्या बाजूला लागून तो पिचच्या जवळच हवेत उडाला. तेव्हा गोलंदाज जहानदाद खान कॅच घेण्यासाठी पळत पुढे आला. त्याच वेळी फलंदाजांनी धाव घेण्यासाठी पळ काढला. जहानदादला पाहून कर्णधार आणि नॉन स्ट्रायकर दिशेला असलेला नुरूल हसनने दिशा बदलली आणि थेट दिशेने धाव घेण्याचे सोडून पिचच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा गोलंदाज कॅच घेण्यासाठी आला. चेंडू त्याच्या थोडा पुढ पडला पण नुरूल जहानदादच्या लाइनमध्ये आला. यामुळे त्याला कॅच पकडता आला नाही. यामुळे त्यांनी अपील केली.
advertisement
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल? नव्हे इनकम टॅक्स ऑफिसर म्हणा, मिळतो इतका पगार
advertisement
मैदानावरील अंपायर अली अरमान आणि आसिफ यकूब यांनी याबाबतचा निर्णय तिसऱ्या अंपायरला विचारला. टीव्ही अंपायर तनवीर अहमद यांनी महेदीला बाद ठरवले. क्रिकेटमधील नियम ३७.३.१ नुसार जर नो बॉल नसेल तर कोणताही फलंदाज फिल्डरला मुद्दम कॅच घेण्यापासून अडथळा निर्माण करू शकत नाही.
आणखी एका भारतीय क्रिकेटपटूचा संसार मोडला? पत्नीचे फोटो डिलिट,अनफॉलो केले
या लढतीत रंगपूर संघाला ६ चेंडूत २६ धावा हव्या होत्या. तेव्हा नुरूल हसनने 6,4,4,6,4,6 धावा करत विजय मिळून दिला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Video: कॅच सोडला तरी अंपायरने आऊट दिले; नॉन स्ट्रायकर फलंदाजाचा मूर्खपणा पाहा
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement