फिल्डरचा प्रताप पाहून संघातील खेळाडूंवर तोंड लपवण्याची वेळ, Video
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Cricket News: भारतासह आशिया खंडात क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. त्या तुलनेत युरोपियन देशात मात्र क्रिकेट लोकप्रिय नाही. या देशात खेळल्या जाणाऱ्या युरोपियन क्रिकेट क्लब मॅचमध्ये अनेक गंमतीदार घटना घडतात.
मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते स्थानिक क्रिकेटमध्ये अनेक अफलातून कॅच आणि फिल्डिंग पहायला मिळते. त्याच बरोबर लाइव्ह सामन्यात अनेकदा ढिसाळ फिल्डिंग देखील दिसते. काही वेळात असे प्रकार होतात जे पाहिल्यानंतर हसू रोखता येत नाही.
क्रिकेटच्या मैदानावर कधी काय होईल याचा भरवसा नाही. एखादी चुरशीची लढत सुरू असताना एखाद्या खेळाडूकडून काही तरी चूक होते आणि मॅचचा निकाल बदलतो. असे म्हटले जाते की मॅच जिंकून देण्यात फिल्डरची भूमिका फार महत्त्वाची असते. फिल्डिंग चांगली झाली तर मॅचचा निकाल बदलू शकतो.
Video: कॅच सोडला तरी अंपायरने आऊट दिले; नॉन स्ट्रायकर फलंदाजाचा मूर्खपणा पाहा
अनेकदा असे होते की, फिल्डरकडून झालेली छोटीशी चूक संघाला महागात पडते. असाच प्रकार युरोपियन क्रिकेट लीगच्या एका मॅचमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाजाने टाकलेला चेंडू वाइड गेला आणि तो विकेटकीपरला देखील पकडता आला नाही. चेंडू सीमारेषा पार करणार असे वाटत असताना फिल्डरने तो पायाने अडवला. चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात फिल्डर सीमा रेषेच्या आत गेला. पुन्हा येऊन चेंडू थ्रो करण्याचा प्रयत्न करताना त्याच्याकडून गंभीर चूक झाली. घाईत चेंडू हाताने उचलून टाकताना तो त्याच्या पायाला लागून सीमा रेषेच्या बाहेर गेला.
advertisement
ऑस्ट्रेलियामध्ये मला जेवणातून विष देण्यात आले; खेळाडूच्या दाव्याने एकच खळबळ
मैदानावरील हा प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या त्याच्या संघातील सहकाऱ्यांवर तोंड लपवण्याची वेळ आली.
advertisement
काय आहे युरोपियन क्रिकेट लीग
युरोपियन क्रिकेट लीग यामध्ये युरोपमधील विविध देशातील क्लब खेळत असतात. या लढती प्रत्येकी १० ओव्हरच्या असतात. युरोपमध्ये क्रिकेटला लोकप्रियता निर्माण व्हावी आणि त्याचा विकास व्हावा यासाठी या लीगची सुरुवात झाली आहे. या लीगची सुरुवात २०१९ साली झाली होती आणि पहिल्या स्पर्धेत ८ संघांनी सहभाग घेतला होता. सध्या यात ३५ संघ आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 11, 2025 3:37 PM IST