जगातील एकमेव फलंदाज जो कधीच शून्यावर बाद झाला नाही; सचिन-लारा,विराट-रोहितसाठी हा विक्रम म्हणजे स्वप्नच ठरले

Last Updated:

Most Runs Without Duck: क्रिकेट विक्रम हे कधीच कायम राहत नाहीत. पण काही विक्रम हे असे असतात ज्यांच्याजवळ पोहोचणे हे दिग्गज खेळाडूंंसाठी देखील स्वप्न ठरते.

News18
News18
नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड होतात आणि ते मोडले देखील जातात. पण काही रेकॉर्ड असे असतात जे मोडणे अशक्य असते. क्रिकेट विश्वात आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले आहेत. मात्र अशा खेळाडूंना देखील काही रेकॉर्ड्स हे करता आले नाहीत. क्रिकेटमधील अशाच एका विक्रमाबद्दल जाणून घेऊयात...
क्रिकेटमध्ये सर्वाधिक विक्रम कोणाच्या नावावर आहेत या प्रश्नाचे उत्तर सचिन तेंडुलकर असेच येईल. पण क्रिकेट विश्वात असा एक खास विक्रम आहे जो सचिनसह अन्य दिग्गज फलंदाजांसाठी स्वप्नच ठरला. वनडे क्रिकेटमध्ये असा एक फलंदाज आहे जो कधीच शून्यावर बाद झाला नाही. विशेष म्हणजे आहे खेळाडू एक नव्हे तर दोन देशांकडून खेळला आहे.
advertisement
टी-20 क्रिकेटमध्ये तांडव! 52 चेंडूत गोलंदाजांची पिसे काढली, 10 षटकारांसह केल्या
कॅप्लर वेसल्स असे या फलंदाजाचे नाव असून ११ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये तो एकदाही शून्यावर बाद झाला नाही. कॅप्लरने करिअरमध्ये १०९ सामने खेळले पण तो कधीच शून्यावर बाद झाला नाही.
१९७०-८० च्या दशकात दक्षिण आफ्रिकेवर क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. यामुळेच अनेक क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांकडून खेळण्याचा निर्णय घेतला. यात कॅप्लरने ऑस्ट्रेलियाची निवड केली. त्याची कामगिरी चांगली होती त्यामुळे १९८३ ते १९८५ या काळात तो ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य होता. १९८५ साळी त्याला संघातून वगळण्यात आले. त्यानंतर आफ्रिकेवरील बंदी मागे घेतल्यानंतर तो पुन्हा मायदेशात परतला.
advertisement
१९९१ साली तो पुन्हा दक्षिण आफ्रिकेकडून खेळू लागला आणि नंतर संघाचा कर्णधार देखील झाला. १९९४ साली जेव्हा कॅप्लरने निवृत्ती घेतली तेव्हा त्याने १०९ वनडे मॅच खेळल्या होत्या. त्यापैकी १०५ डावात ३४.३५च्या सरासरीने ३ हाजर ३६७ धावा केल्या. वनडेत त्याने १ शतक आणि २६ अर्धशतक झळकावले आहेत. यात सर्वात विशेष म्हणजे तो एकदाही शून्यावर बाद झाला नाही.
advertisement
कपिल देवच्या घरी जाऊन त्याच्या डोक्यात गोळ्या घालणार होतो- योगराज सिंग
कॅप्लर वेसल्स हा जगातील एकमेव फलंदाज ज्याने वनडेत शून्यावर बाद न होता २ हजार धावा केल्या आहेत. शून्यावर कधीच बाद न होणारा आणखी एक फलंदाज म्हणजे न्यूझीलंडचा डेरिल मिचेल होय. ज्याने ४२ वनडेतील ३७ डावात १ हजार ६५१ धावा केल्या आहेत. आता मिचेल कॅप्लरचा रेकॉर्ड मोडतो की नाही हे पहावे लागले.
advertisement
भारतीय फलंदाजांमध्ये शून्यावर बादन होता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यशपाल शर्माच्या नावावर आहे. शर्मा यांनी ४२ सामन्यात शून्यावर बाद न होता ८८३ धावा केल्या होत्या. शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ते नवव्या स्थानावर आहेत.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
जगातील एकमेव फलंदाज जो कधीच शून्यावर बाद झाला नाही; सचिन-लारा,विराट-रोहितसाठी हा विक्रम म्हणजे स्वप्नच ठरले
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement