नोंदणीसाठी पात्र व्यवसाय उपक्रम
- ज्यांची भांडवली गुंतवणूक एक कोटी रुपयांपर्यंत असेल आणि उलाढाल पाच कोटी रुपयांपर्यंत असेल अशा व्यावसायिक उपक्रमांची नोंद सूक्ष्म उद्योगांमध्ये केली जाईल.
- ज्यांची भांडवली गुंतवणूक 10 कोटी रुपयांपर्यंत असेल आणि उलाढाल 50 कोटी रुपयांपर्यंत असेल अशा व्यवसायांची लघू उद्योगांतर्गत नोंद होईल.
- ज्यांची भांडवली गुंतवणूक 50 कोटी रुपयांपर्यंत असेल आणि उलाढाल 250 कोटी रुपयांपर्यंत असेल अशा व्यवसायांची नोंद मध्यम श्रेणीमध्ये होईल.
advertisement
एमएसएमई रजिस्ट्रेशनचे फायदे
- बँकांकडून परवडणाऱ्या व्याजदरात कर्ज
- आयकरात सवलत
- उद्योगासाठी लवकर परवाना मिळतो
- एमएसएमईमध्ये नोंदणीकृत उद्योगांना प्राधान्य मिळतं.
- वीज बिलात सूट मिळते
- जास्त उत्पादनावर मोठी कर सवलत
शेतकऱ्याने घेतले एकरी 120 टन ऊस उत्पादन, पाहा कशी केली शेती? Video
रजिस्ट्रेशनसाठी गरजेचे तपशील
- आधार नंबर
- पॅन नंबर
- व्यवसाय असलेल्या ठिकाणाचा पत्ता
- बँक अकाउंट नंबर
- मूलभूत व्यवसायिक घडामोडींची माहिती
- एनआयसी (2 अंकी कोड)
- गुंतवणुकीचे तपशील (प्लांट/डिव्हाइसचे तपशील)
- टर्नओव्हर डिटेल
- पार्टनरशिप डीडची माहिती
- खरेदी-विक्रीच्या बिलांच्या प्रती
- खरेदी केलेल्या मशीनचे परवाने आणि बिलाच्या प्रती
ट्रेन सुटण्याच्या किती वेळ आधी तिकीट बुक करता येतं? जाणून घ्या नियम
रजिस्ट्रेशनची प्रक्रिया
- msme.gov.in या एमएसएमईच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- About Us पर्यायावर क्लिक करा आणि ऑनलाईन सर्व्हिसेस अंतर्गत उद्यम रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करा.
- नवीन रजिस्ट्रेशनसाठी 'For New Entrepreneurs who are not Registered yet as MSME or those with EM-II' या पर्यायावर क्लिक करा.
- समोर आलेल्या फॉर्ममध्ये गरजेची माहिती भरा आणि डॉक्युमेंट्स सबमिट करा.
