TRENDING:

पेनी स्टॉक्स म्हणजे काय? गुंतवणूक करण्याआधी 'या' गोष्टी वाचा

Last Updated:

What is Penny Stock : हे पेनी स्टॉक्स म्हणजे काय, ते किती विश्वासार्ह आहेत आणि त्यातून किती रिटर्न मिळू शकतात याबाबत नक्की कुणी सांगू शकत नाही, यात गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊयात.

advertisement
तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर पेनी स्टॉक्स (Penny Stock) हा शब्द नक्कीच ऐकला असेल. काही जण यात गुंतवणूक करतात कारण त्याच्या किमती कमी असतात. तर हे पेनी स्टॉक्स म्हणजे काय (What is the meaning of Penny Stock), ते किती विश्वासार्ह आहेत आणि त्यातून किती रिटर्न मिळू शकतात याबाबत नक्की कुणी सांगू शकत नाही, यात गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

पेनी स्टॉक्स म्हणजे काय? (Meaning Of Penny Stock In Marathi)

शेअर बाजारात ब्लूचिप, लार्जकॅप, मिडकॅप व स्मॉलकॅप कंपन्यांचे शेअर असतात, त्यात लोक गुंतवणूक करतात. पण काही शेअर्स असे असतात ज्यांची व्हॅल्यू 10 रुपयांपेक्षा कमी असते, त्यांना शेअर बाजारातील भाषेत पेनी स्टॉक्स म्हणतात. पेनी स्टॉक्सच्या काही कंपन्या खराब असतात. सुझलॉन एनर्जी अशीच कंपनी आहे, त्यांच्या शेअर्सची किंमत सध्या सात-आठ रुपये आहे, पण ही कंपनी भविष्यात मल्टिबॅगर रिटर्न देईल असं लोकांना वाटतं.

advertisement

पेनी स्टॉक्सची ठराविक व्याख्या नाही, काही लोक 20 रुपयांपेक्षा कमी शेअर प्राईज व कमी मार्केट कॅपच्या कंपन्यांना पेनी स्टॉक्स मानतात. काही वेळा लोक हा विचार करून चार-पाच रुपयांचे शेअर्स घेतात की त्याचे भाव सात-आठ रुपये झाले तरी त्यांना फायदा होईल. शेअर्स चांगले की वाईट हे कंपनीची फायनान्शिअल हेल्थ, फंडामेंटल्स व बिझनेस या गोष्टींवर ठरते.

advertisement

पेनी स्टॉक किती विश्वासार्ह? (How reliable buying Penny Stock)

पेनी स्टॉक्समधील गुंतवणुकीत खूप जोखीम असते. त्यात सतत चढ-उतार होतात. त्यामुळे कमी वेळेत मालामाल व कंगाल होण्याचा दोन्ही धोका असतो. काही वेळा गुंतवणुकदारांचं लक्ष वेधण्यासाठीच प्रमोटर्स त्या शेअर्सचे दर वाढण्यास जबाबदार असतात. पेनी स्टॉक्समध्ये बारकावे समजून घेत गुंतवणूक केली तरंच फायदा होऊ शकतो. या स्टॉकच्या किमती कमी असल्याने काही पैसेवाले लोक आपलेच पैसे शेअरमध्ये लावून किंमत वाढवतात. चांगले रिटर्न पाहून लोक गुंतवणूक करतात, मग किंमत वाढते आणि हे शेअर ऑपरेटर नफा कमवून यातून बाहेर पडतात.

advertisement

पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा (Things to keep in mind while buying Penny Stock)

1. अपर व लोअर सर्किट लागलं असेल अशा पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करूच नका. कारण त्यात एकदा गुंतवणूक केल्यावर ते विकणं कठीण होऊ शकतं. तसेच लोअर सर्किट लागल्याने जास्त नुकसान होतं.

2. पेनी स्टॉक्सच्या किमती पाहून कधीच इन्व्हेस्ट करू नका. चांगले रिटर्न देणाऱ्या शेअर्समध्येच गुंतवणूक करा.

advertisement

3. तुम्ही पेनी स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करत असाल तर जास्त नफ्याचा लोभ धरू नका. ठरवल्याप्रमाणे फायदा होत असेल तर शेअर्स विका. जास्त नफ्याच्या लालसेपोटी नुकसान होऊ शकतं.

4. सगळे पेनी स्टॉक्स वाईट नसतात. पण गुंतवणूक करण्याआधी त्या कंपन्या काय करतात, त्यांचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, फायदे व तोटे याबाबत जाणून घ्या. कंपनी चांगली असेल गुंतवणूक करू शकता.

मराठी बातम्या/मनी/
पेनी स्टॉक्स म्हणजे काय? गुंतवणूक करण्याआधी 'या' गोष्टी वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल