TRENDING:

PF Update: तुमच्या PF अकाउंटमध्ये कधी जमा होईल पैसा? पाहा EPFO ने काय म्हटलं

Last Updated:

आर्थिक वर्ष 2022-23 साठी, पीएफ अकाउंटमधील जमा ठेवींवरील व्याजदर 8.10% वरून 0.05% वाढवून 8.15% पर्यंत करण्यात आला आहे.

advertisement
मुंबई, 8 ऑगस्ट: सरकारने फायनेंशियल ईयर 2022-23 साठी भविष्य निधीमध्ये जमा रकमेवर मिळणारे व्याज वाढवून 8.15 टक्के केलंय. यानंतर कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे सदस्य आपल्या अकाउंटमध्ये व्याज जमा होण्याची प्रतीक्षा करत आहेत. याविषयी एका सदस्याने ट्विट करत EPFO ला त्यांच्या अकाउंटमध्ये व्याज कधी जमा होणार याविषयी विचारणा केली होती. यावर EPFO ने उत्तर दिलं आणि व्याज जमा होण्याच्या स्टेटसविषयी सदस्यांना सूचित केलंय.
ईपीएफओ न्यूज
ईपीएफओ न्यूज
advertisement

व्याज कधी जमा होईल

EPFO ने उत्तर दिले की, 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अकाउंटमध्ये व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पाइपलाइनमध्ये आहे. ते लवकरच जमा होईल. व्याज दिले जाईल तेव्हा पूर्णच दिले जाईल. व्याजाचे कोणतेही नुकसान होणार नाही. EPF अकाउंटमध्ये व्याज केवळ मासिक आधारावर मोजले जाते. परंतु ते आर्थिक वर्षाच्या शेवटी सभासदांच्या अकाउंटमध्ये जमा केले जाते.

advertisement

Financial Stress: आर्थिक ताण कमी करायचा आहे? मग ह्या 6 प्रॅक्टिकल टीप्स आजच अमलात आणा

24 जुलै रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 साठी, पीएफ अकाउंटमधील ठेवींवरील व्याजदर 8.10% वरून 0.05% वाढवून 8.15% पर्यंत करण्यात आला आहे. हे पैसे ऑगस्ट 2023 पर्यंत देशातील 6.5 कोटी ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात पोहोचण्यास सुरुवात होईल. महत्त्वाचे म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPFO ​​ने EPF खात्यासाठी 8.10 टक्के व्याजदर निश्चित केला होता.

advertisement

अशा प्रकारे पगारातून पीएफ कापला जातो

तुम्ही EPFO ​​कायदा बघितला तर कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बेस पे आणि डीएच्या 12 टक्के रक्कम पीएफ अकाउंटमध्ये जमा केली जाते. यावर संबंधित कंपनी कर्मचार्‍यांच्या पीएफ खात्यात 12% रक्कम देखील जमा करते.मात्र, कंपनीने केलेल्या योगदानापैकी 3.67 टक्के रक्कम EPF खात्यात जाते, तर उर्वरित 8.33 टक्के रक्कम पेन्शन योजनेत जाते.

advertisement

PPF मध्ये गुंतवणूक करता? मग महिन्याच्या 'या' तारखेला पैसे नक्की जमा करा, होईल फायदाच फायदा

किती फायदा होईल?

आता PF च्या गणिताबद्दल बोलूया, जर तुमच्या PF अकाउंटमध्ये 31 मार्च 2023 पर्यंत एकूण 10 लाख रुपये जमा असतील तर आतापर्यंत तुम्हाला 8.10 टक्के दराने 81,000 रुपये व्याज मिळत होते. दुसरीकडे, आता सरकारने पीएफचा व्याजदर 8.15 टक्के केला आहे, त्यानुसार, अकाउंटमध्ये जमा केलेल्या 10 लाखांवर तुम्हाला 500 रुपयांचा थेट लाभ मिळेल.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
PF Update: तुमच्या PF अकाउंटमध्ये कधी जमा होईल पैसा? पाहा EPFO ने काय म्हटलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल