PPF मध्ये गुंतवणूक करता? मग महिन्याच्या 'या' तारखेला पैसे नक्की जमा करा, होईल फायदाच फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
जर एखाद्या PPF खातेधारकाने कोणत्याही महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत त्याच्या PPF खात्यात पैसे जमा केले, तर तो त्या महिन्यासाठी PPF व्याजासाठी देखील पात्र असेल.
मुंबई : भारत सरकारकडून गुंतवणुकीसाठी सर्वसामान्यांसाठी अनेक लहान बचत योजना उपलब्ध आहेत. यामध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF), सीनिययर सिटिजन सेव्हिंग स्कीम (SCSS), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC), किसान विकास पत्र (KVP), सुकन्या समृद्धी योजना (SSY) अशा अनेक योजना आहेत. या प्लान्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला हमखास परतावा मिळतो. यासाठी तुम्ही दरमहा ठराविक रक्कमही जमा करा. परंतु यापैकी, PPF ही अशी योजना आहे ज्यामध्ये दरमहा देय तारखेपर्यंत पैसे जमा करणे महत्त्वाचे होते. PPF खाती पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडली जातात.
PPF मध्ये तारखेला महत्त्व
पीपीएफमध्ये कोणत्या तारखेला गुंतवणूक करता आणि कोणत्या तारखेला तुम्ही पैसे जमा करता त्यानुसार व्याजदर ठरतो. पीपीएफमध्ये, व्याजदर दरवर्षी मिळत असतो, परंतु चक्रवाढ व्याजाची गणना दर महिन्याला केली जाते. PPF खात्याच्या नियमांनुसार, PPF खात्यावरील व्याज 5 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत PPF खात्यात उपलब्ध असलेल्या किमान शिल्लकच्या आधारावर मोजले जाते.
advertisement
जर एखाद्या PPF खातेधारकाने कोणत्याही महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत त्याच्या PPF खात्यात पैसे जमा केले, तर तो त्या महिन्यासाठी PPF व्याजासाठी देखील पात्र असेल.
मात्र तुम्ही 5 तारखेनंतर पैसे जमा केले तर तुम्हाला व्याजाचे नुकसान सहन करावे लागेल, ज्याचा परिणाम तुमच्या परताव्यावरही होईल. दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा करणे शहाणपणाचे आहे.
advertisement
पीपीएफ खात्याचे फायदे
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पीपीएफ हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. यात 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. निवृत्तीच्या वेळी त्याचा खूप फायदा होतो. पीपीएफमधून मिळणारे उत्पन्न करमुक्त आहे. तुम्ही आयकर कलम 80C अंतर्गत यावर कर सूट देखील घेऊ शकता. यावर मिळणारे व्याजही करमुक्त आहे. सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज आहे.
advertisement
PPF खात्यात गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर कपातीचा लाभ मिळतो. त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या दोन्हींवर कर सूट उपलब्ध आहे, त्यामुळे केवळ मॅच्युरिटीच्या वेळीच नव्हे तर वार्षिक आधारावर करमुक्तीचा हा एक चांगला पर्याय आहे. कर आकारणीच्या ट्रिपल ई (EEE) मॉडेलमुळे हा चांगला परतावा देणारे प्रोडक्ट मानले जाते.
advertisement
वार्षिक किती पैसे जमा करावे लागतील?
view commentsPPF मध्ये, तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वार्षिक किमान 500 रुपये जमा करावे लागतील. याशिवाय तुम्ही एका वर्षात तुमच्या PPF खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. PPF खाते 15 वर्षांच्या लॉक-इन कालावधीसह येते. सध्या तुम्हाला PPF अंतर्गत 7.1 टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ मिळतो. PPF मध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या आयकर सवलतीचा लाभ देखील मिळतो. PPF अंतर्गत मिळणारे व्याज पूर्णपणे कराच्या कक्षेबाहेर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 08, 2023 9:33 AM IST
मराठी बातम्या/मनी/
PPF मध्ये गुंतवणूक करता? मग महिन्याच्या 'या' तारखेला पैसे नक्की जमा करा, होईल फायदाच फायदा











