छोट्या फायनेन्स बँकांमधील FD सर्वात फायदेशीर आहेत
छोट्या फायनेन्स बँका सध्या गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक व्याजदर देत आहेत. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने 3 वर्षांच्या FDवर 7.65% हा सर्वोच्च व्याजदर निश्चित केला आहे. त्यानंतर स्लाईस स्मॉल फायनान्स बँक आणि जना स्मॉल फायनान्स बँक यांचा क्रमांक लागतो, जे 7.50% व्याज देतात. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 7.25% व्याज देत आहे आणि एयू स्मॉल फायनान्स बँक 7.10% व्याज देत आहे. तसंच, छोट्या फायनान्स बँकांमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. या बँका फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची DICGC हमी देतात, म्हणजेच तुमचे भांडवल आणि व्याज या मर्यादेपर्यंतच सुरक्षित असते.
advertisement
15 वर्षात तयार होईल ₹1 कोटींचा फंड! पाहा किती करावं लागेल SIP
प्रायव्हेट बँका देखील चांगले रिटर्न देत आहेत
खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये, RBL बँक आघाडीवर आहे, 3 वर्षांच्या FD वर 7.20% व्याजदर देते. त्यानंतर SBM बँक इंडिया 7.10% व्याजदर देते. बंधन बँक, येस बँक आणि DCB बँक 7% व्याजदर देत आहेत, तर इंडसइंड बँक 6.90% आणि ICICI बँक आणि अॅक्सिस बँक 6.60% व्याजदर देत आहेत.
PPF Withdrawal : PF अकाउंटमधून कधी आणि कसे काढू शकता पैसे? मॅच्युरिटीपूर्वीची प्रोसेस समजून घ्या
सार्वजनिक बँका विश्वासार्ह राहतात
तुम्ही तुमच्या पैशाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले तर, सार्वजनिक क्षेत्रातील बँका अजूनही सर्वात विश्वासार्ह ऑप्शन आहेत. यापैकी, युनियन बँक ऑफ इंडिया 3 वर्षांच्या FD वर 6.60% चा सर्वाधिक व्याजदर देत आहे. यानंतर, बँक ऑफ बडोदा 6.50%, पीएमबी 6.40% आणि एसबीआय 6.30% व्याज देत आहे.
