बाजारासाठी निवडणुकीचे निकाल असणार ट्रिगर
फिस्डॉमचे रिसर्च हेड नीरव करकेरा यांनी म्हटलं, की बाजारात झालेल्या घसरणीनंतर आज सावरण्याचा प्रयत्न केला. निर्देशांक आजही तेजीचा ट्रेंड कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकतील. परंतु वाढ मर्यादित राहण्याची शक्यता आहे. देशात सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा बाजारावर परिणाम होत आहे कारण सध्याच्या भाजप-एनडीए सरकारच्या विजयाच्या फरकाकडे बाजाराचं लक्ष लागलं आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरांग शाह म्हणाले, "निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत बाजार अस्थिर राहून असेच चढ-उतार राहण्याची शक्यता आहे."
advertisement
निफ्टीसाठी महत्त्वाची लेव्हल
सध्या बाजारासाठी कोणतेही पॉझिटिव्ह क्लू नाहीत. त्यामुळे बाजार कमजोर राहण्याची दाट शक्यता आहे. असित सी मेहता, इन्व्हेस्टमेंट इंटरमीडिएट्सचे एव्हीपी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह रिसर्च हृषिकेश येडवे म्हणाले, "जोपर्यंत निफ्टी 22,400च्या खाली राहील तोपर्यंत कमी काळासाठी कमजोरी कायम राहील. जर बेंचमार्क 22,410 च्या वर गेला, तर आपल्याला 22,500-22,600 पर्यंत रिलीफ रॅली दिसू शकते," असंही त्यांनी नमूद केलं.
मागच्या एका आठवड्यात शेअर मार्केटमध्ये बरीच घसरण पाहायला मिळत आहे. मार्केट अस्थिर झाल्याने गुंतवणुकदारही चिंतेत आहेत. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचा परिणाम शेअर मार्केटवर दिसून येत आहे.