आधार केंद्रात देशभर भरती; अर्ज कसा करायचा ते पाहा
ही भरती CSC ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया यांच्या माध्यमातून केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे ही भरती देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार असल्याने स्थानिक पातळीवरील तरुणांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
आधार सुपरवायझर,ऑपरेटर भरती 2026 अंतर्गत एकूण सुमारे 282 पदे भरली जाणार आहेत. ही पदे जिल्हा आणि तालुका स्तरावर असल्यामुळे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, झारखंड, राजस्थान, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ अशा अनेक राज्यांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. महाराष्ट्रात सुमारे 20 पदे, मध्य प्रदेशात 28, उत्तर प्रदेशात 23 तर पंजाबमध्ये 12 पदे निश्चित करण्यात आली आहेत.
अर्ज करण्यासाठी उमेदवाराने बारावी उत्तीर्ण, किंवा दहावी आणि TI किंवा दहावी आणि पॉलिटेक्निक डिप्लोमा पूर्ण केलेला असावा. यासोबतच UIDAI मान्यताप्राप्त आधार ऑपरेटर,सुपरवायझर सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे.
या भरतीसाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे असून कमाल वयोमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2026 आहे. इच्छुक उमेदवारांनी CSC च्या अधिकृत वेबसाईट cscspv.in येथे जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
