नेहा खान उर्फ नेहा इप्टे आणि तिच्या साथीदारांनी दबाव, मारहाण आणि अश्लील व्हिडिओच्या माध्यमातून धमकावल्याचा दावा तरुणाकडून करण्यात आला आहे. तरूणाला ब्लॅकमेल करत, त्याच्यावर दबाव टाकत त्याची जेंडर सर्जरी करण्यात आल्याची तक्रार त्याने पोलिसांना दिली आहे. जेंडर सर्जरी करण्यासाठी नेहा आणि त्याच्या साथीदारांकडून त्या तरूणाला सतत ब्लॅकमेलिंग केली जात होते. त्याने इच्छा नसतानाही ही शस्त्रक्रिया केली आहे. घडलेली सर्व घटना तरूणाने पोलिसांना सांगत त्या तृतीयपंथीयांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
advertisement
तरूणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 28 ऑक्टोबरला आरोपींनी तरूणाला सुरतच्या रूग्णालयात नेले. इच्छा नसतानाही त्या तरूणावर जेंडर बदलची शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढे शस्त्रक्रियेनंतर त्या तरूणाला भिक्षा मागायला भाग पाडले. शिवाय, त्याच्याकडून पैसे उकळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तसंच, त्यांचं ऐकलं नाही तर सातत्याने धमक्यादेखील देण्यात आल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. अखेर 4 नोव्हेंबरला तिथून पळ काढत स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली. पीडित तरुणाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मालवणी पोलिसांनी अपहरण, ब्लॅकमेल, जबरदस्ती आणि वैद्यकीय अत्याचारासह अशा अनेक कलमांखाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून रुग्णालय रेकॉर्ड आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे.
