नाईक यांच्या स्टॉलवर दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या वस्तू अतिशय परवडणाऱ्या दरात मिळतात. टूथब्रश पॅकर फक्त 50 रुपयांना तर विविध प्रकारचे ब्रश 50 ते 100 रुपयांत उपलब्ध आहेत. पाण्याची गाळणी 20 ते 30 रुपयांत तर जेवणाचे डबे आणि पाण्याच्या बॉटल्या 100 ते 250 रुपयांच्या किंमतीत मिळतात. हँड फॅन 50 रुपयांपासून मिळतो.
advertisement
याशिवाय काही खास आणि युनिक वस्तू ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरतात. पुरी किंवा पापड तळण्यासाठी उपयोगी पडणारा विशेष चमचा फक्त 50 रुपयांना मिळतो. लसूण बारीक करण्याचे छोटे यंत्रही 50 रुपयांत उपलब्ध आहे. विंडो ग्रील साफ करण्याची साधने, पाय घासणी आणि लाकडी फणी या वस्तू 50 ते 100 रुपयांच्या किमतीत मिळतात. शिवाय 10 रुपयांपासून 200– 300 रुपयांपर्यंतच्या किफायतशीर साहित्यामुळे प्रत्येक वर्गातील ग्राहक समाधानी राहतो.
ग्राहकांशी नाईक आजोबा अगदी आपुलकीने संवाद साधतात. ग्राहकांशी जुळलेला हा जिव्हाळ्याचा संबंधच त्यांच्या स्टॉलचे वेगळेपण टिकवून आहे. दादरच्या धावपळीच्या जीवनात गेली 40 वर्षे सातत्याने सेवा देत असलेला हा स्टॉल आजही अनेकांसाठी गरजेचा विश्वासाचा आणि ओळखीचा ठिकाण म्हणून नावारूपाला आहे.