TRENDING:

Abhishek Ghosalkar : ...आणि 3 गोळ्या लागल्यानंतरही घोसाळकर अंगावर धावून गेले, मॉरिसच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं? नवी माहिती समोर

Last Updated:

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी मॉरिसने हत्या केली. घोसाळकरांवर गोळीबार केल्यानंतर मॉरिसने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. पण, त्यावेळी नेमंक काय घडलं हे समोर आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय वंजारा, प्रतिनिधी
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण
advertisement

मुंबई : ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हादरून गेला. मॉरिस नावाच्या गुंडाने फेसबुक लाईव्ह सुरू असताना घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. पण आणखी काही उत्तरं अजूनही मिळाली नाही. ज्यावेळी मॉरिसच्या ऑफिसमध्ये गोळीबार झाला तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याची माहिती समोर आली आहे.

advertisement

ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रुवारी रोजी मॉरिसने हत्या केली. घोसाळकरांवर गोळीबार केल्यानंतर मॉरिसने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. पण, त्यावेळी नेमंक काय घडलं हे समोर आलं आहे.

फेसबुक लाईव्ह सुरू असताना मॉरिसने मोठ्या शिताफीने घोसाळकरांना पुढे बोलण्यास सांगितलं. त्यानंतर मॉरिस आतमध्ये गेला आणि पिस्तुल घेऊन आला. जसे घोसाळकर उभे राहिले त्याने बेछुटपणे गोळीबार सुरू केला. मॉरिसने 5 गोळ्या झाड्या होत्या, 3 गोळ्या घोसाळकरांना लागल्या. घोसाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

advertisement

(Abhishek Ghosalkar : 'व्हॅलेंटाइन डे'ला लग्नाचा वाढदिवस, 4 दिवस आधी घात; मैत्रीचा हात पुढे करून झाली हत्या)

त्यानंतर एक गोळी बंदुकीत उरली होती. मॉरिसने उरलेली एक गोळी घोसाळकर यांच्यासमोरच स्वत:च्या डोक्यात झाडण्याचा प्रयत्न केला होता. पण गन ही लॉक झाली होती. 3 गोळ्या लागल्यानंतरही घोसाळकरांनी मॉरिसवर झेप घेतली होती. त्याच्या हातातून ती पिस्तुल हिसकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला.

advertisement

तोपर्यंत ऑफिसच्या बाहेर उभे असलेल्या घोसाळकरांच्या कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यांनी धाव घेतली. कार्यकर्ते धावत येताना पाहून मॉरिस घाबरला आणि पोटमाळ्यावर पळून गेला. त्यानंतर त्याने पिस्तुल पुन्हा रिलोड केली आणि डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

विशेष म्हणजे, हत्येच्या एक दिवस आधी घोसाळकर आणि मॉरिस हे ऑफिसमध्ये बसले होते. रात्री 11 वाजता बसले होते. आणि ते गेल्यानंतर मॉरिस हा आपल्या मित्रांसोबत रात्री फिरत होता. रात्री सोमनिया बारमधून त्याने एक बिअर विकत घेतली. रात्रभर पित होता. दुसऱ्या दिवशी हत्या केली.

advertisement

मॉरिसकडे पिस्तुल कुठून आली?

मॉरिस भाईने गोळीबारात जी पिस्तुल वापरली होती, ते बेकायदेशीर असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून मॉरिसला शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही. मॉरिसने ज्या पिस्तुलाने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या घातल्या त्या पिस्तुलाचा परवाना प्रयागराजच्या फुलपूर पोलिसांनी जारी केला आहे. मात्र, अंगरक्षकाने मुंबईत त्याची नोंद केलेली नाही, हे नियमांचे उल्लंघन आहे. या प्रकरणी त्याच्या अंगरक्षकाला अटक करण्यात आली आहे.

मॅारीस ने का केली आत्महत्या?

शक्यता 1- मॅारीस नैराश्यात गेला होता कारण पत्नी आणि मुलगी त्याच्यापासून दुरावल्या होत्या. कुटूंबाने साथ सोडल्याने तो दुखावला होता.

शक्यता 2 -अभिषेक घोसाळकरमुळे आपल्याला जेलवारी करावी लागली. त्यामुळे समाजात आपली प्रतिमा मलिन झाली. आपले राजकिय स्वप्न भंगले हे नैराश्य मॅारिसला होते.

शक्यता 3 - अभिषेखची हत्या केल्यानंतर आता आपल्याला हालहाल करून मारतील या भिततीतून केली आत्महत्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

शक्यता 4 - एकाच वॅार्डातून निवडणुक लढण्यासाठी चाललेल्या चढाओढीत सर्वात मोठा काटा काढल्यानंतर हा सगळा प्रकार कॅमेरात कैद झाल्यामुळे आपले कौटुंबिक आणि राजकिय दोन्ही आयुष्य संपले असं वाटल्यामुळे आत्महत्या केल्याची शक्यता

मराठी बातम्या/मुंबई/
Abhishek Ghosalkar : ...आणि 3 गोळ्या लागल्यानंतरही घोसाळकर अंगावर धावून गेले, मॉरिसच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी नेमकं काय घडलं? नवी माहिती समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल