ऐरोली-कटाई उन्नत मार्गाचे काम अंतिम टप्प्यात
या फ्री-वेच्या माध्यमातून ऐरोली ते डोंबिवलीजवळील कटाई नाक्यापर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. पारसिक डोंगरातून आधुनिक भुयारी बोगदा तयार करण्यात आला असून त्यामुळे प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन मे 2018 मध्ये करण्यात आले होते. मात्र कोरोना काळ, विविध शासकीय परवानग्या, वनविभाग, सीआरझेड झोन, रेल्वे ट्रॅकवरील गर्डर काम, महावितरणच्या उच्च दाब विद्युत वाहिन्या, वृक्षछाटणी परवाने अशा अनेक अडचणींमुळे प्रकल्प रखडला होता.
advertisement
सात वर्षांनंतर अखेर हा प्रकल्प पू्र्ण होणाक असून 2026 मध्ये मुंबईकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर ऐरोली परिसरातील जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल. मुंबईहून येणारी जड वाहने थेट कल्याणकडे आणि कल्याणकडून येणारी वाहने थेट मुंबईकडे या फ्री-वेवरून जातील.
यामुळे महापे, शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल तसेच अपघातांचे प्रमाणही घटेल. मुंबईच्या फ्री-वेच्या अनुसार हा अॅक्सेस कंट्रोल्ड उन्नत मार्ग असून प्रवाशांसाठी सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर ठरणार आहे.
