करिअरमध्ये संधी
गुरुजी शुभम पंचभाई यांच्या मते, वृषभ राशीसाठी जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 हे वर्ष स्थैर्य, आत्मविश्वास आणि प्रगतीचे ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असेल. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती, नवीन जबाबदाऱ्या आणि वरिष्ठांकडून मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. विशेषतः जुलै ते डिसेंबर या कालावधीत केलेल्या कष्टांचे चीज होऊन यश प्राप्त होईल.
advertisement
व्यवसायात यश
व्यवसाय क्षेत्रात नवीन भागीदारी, करार तसेच विस्ताराचे संकेत आहेत. कला, बँकिंग, शेती, अन्नपदार्थ, फॅशन, डिझाईन आणि सौंदर्याशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यात उत्तम धनलाभ होईल. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो, तसेच घर किंवा मालमत्ता खरेदीचे योगही संभवतात. मात्र, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल.
प्रेम आणि विवाह
प्रेम आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमात अनपेक्षित सुखद धक्के मिळू शकतात. अविवाहितांसाठी विवाह जुळण्याचे योग असून, विवाहितांच्या आयुष्यात सौहार्द आणि समजूतदारपणा वाढेल. घरात धार्मिक विधी, पूजा, समारंभ किंवा मंगलकार्य होण्याची दाट शक्यता आहे.
आरोग्यासाठी वर्ष कसं?
आरोग्याच्या बाबतीत वर्ष साधारण असेल. मात्र थायरॉईड, पचनसंस्था, मानदुखी किंवा संधिवात यांसारख्या तक्रारी डोके वर काढू शकतात. त्यामुळे योग, प्राणायाम आणि सात्विक आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे.
यशप्राप्तीसाठी उपाय
गुरुच्या प्रभावामुळे शिक्षण आणि करिअरमध्ये उन्नती होईल. राहु-केतूच्या प्रभावामुळे काही काळ अस्थिरता जाणवू शकते, पण संयम आणि योग्य निर्णय घेतल्यास परिस्थिती अनुकूल होईल. उपाय म्हणून शुक्रवारी देवीला सुगंधी पुष्प अर्पण करणे, ॐ शुक्राय नमः या मंत्राचा दर शुक्रवारी 108 वेळा जप करणे तसेच स्वच्छ वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल. पांढरा, गुलाबी आणि हलका निळा हे शुभ रंग मानले गेले आहेत.





