काकांना धोबीपछाड: तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार शेकापच्या जयंत पाटलांनी अवघी बारा मत मिळाली आहेत, खरंतर लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर हा विजय अजित पवारांसाठी महत्वाचा होता. त्यामुळे कुठेतरी अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षातील सहकाऱ्यांना यामुळे बुस्टर डोस मिळाला, असं म्हणावं लागेल.
विधानपरिषदेत महायुतीचे 9 उमेदवार विजयी; मविआला धोबीपछाड
advertisement
विजयानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया: "महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ उमेदवार विजयी ठरले. या निवडणुकीकडे महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष होतं. राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे आगामी काळात आमदारांनी दाखवलेल्या विश्वासाला हे माझे दोन्ही विजयी उमेदवार सार्थ ठरवतील, सर्व महायुतीला मतदान करणाऱ्या आमदारांचे आभार मानतो. बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीत एक अधिकचा उमेदवार आल्याने निवडणुकीत ट्वीस्ट आला होता. " अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी दिली आहे.
