9 डिसेंबर रोजी सकाळी 11.57 वाजता वसई पूर्व, वालीव येथील शालीमार हॉटेलसमोर असलेल्या अंबिका ज्वेलर्स दुकानात फिर्यादी यांचे भाऊ कालुसिंग खरवट दुकानात असताना एक अनोळखी पुरुष व महिला लहान मुलासह दुकानात आले. अंगठी दाखवण्याचा बहाणा करत त्यांनी दुकानदाराला मुलासाठी पाणी आणायला सांगितले. दुकानदार दुकानातील आतील खोलीत गेल्याबरोबर पुरुष आरोपी त्याच्या मागे गेला आणि त्याच्यावर चाकूने सलग वार केले. पोटावर, हातांवर, गालावर व हनुवटीवर गंभीर जखमा करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
या प्रकरणी वालीव पोलीस ठाणे गुन्हा क्र. 701/2025 अन्वये बी.एन.एस. कलम 109, 3(5) प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे. घटनेनंतर गुन्हे शाखा कक्ष-४ च्या पथकाने तत्काळ घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा मागोवा घेत नाशिक रोड परिसरातून दोघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपी सोहेल शराफत खान, फिरदोस बानो सोहेल खान त्यांच्या गुन्ह्यातील सक्रिय भूमिकेची खात्री पटल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी वालीव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
ही कारवाई पुढील आयुक्त निकेत कौशिक पोलीस अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त
संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोनि प्रमोद बडाख,सपोनि प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, सफौ मनोहर तावरे, संतोष मदने, पो.हवा. शिवाजी पाटील, धनंजय चौधरी,प्रविणराज पवार, हनुमंत सुर्यवंशी,रविंद्र भालेराव, विजय गायकवाड,समिर यादव, संदिप शेरमाळे,आश्विन पाटील, विकास राजपुत, सनी सुर्यवंशी, मपो.हवा. दिपाली जाधव, मसुब सचिन चौधरी व गुन्हे शाखा कक्ष-४ चे संपूर्ण पथकाने ही कामगिरी केली आहे.
