महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिन्यांना आधुनिक डिझाइनचा साज देत दिव्या वेगळा आणि आकर्षक लूक तयार करते. हे सर्व दागिने ती पूर्णपणे स्वतःच्या हाताने बनवते. दागिन्यांच्या निर्मितीसाठी ती जपानी पद्धतीचे साहित्य वापरत असल्यामुळे तिच्या ज्वेलरीला खास ओळख मिळत आहे. सकाळी ऑफिसची जबाबदारी पार पाडल्यानंतर घरी परतल्यावर दिव्या दागिन्यांचे काम करते. हे काम केल्याने दिवसभराचा ताण कमी होतो आणि आवड जोपासल्याचा आनंद मिळतो, असे ती सांगते. या प्रवासात कुटुंबाचा, विशेषतः आईचा, तिला सातत्याने पाठिंबा मिळत आहे.
advertisement
दिव्या विविध प्रदर्शनांमध्ये आणि एक्झिबिशनमध्ये सहभागी होत आपली ज्वेलरी ग्राहकांपर्यंत पोहोचवते. गेल्या वर्षभरापासून दिव्या हा ज्वेलरीचा बिझनेस करत असून यामधून तिला पार्ट- टाइम स्वरूपाचे उत्पन्न मिळत आहे. या ज्वेलरी व्यवसायातून दिव्याला वर्षाकाठी सुमारे अडीच लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न मिळत आहे. नोकरीसोबत स्वतःची आवड जपत आर्थिक स्वावलंबन साधणारी दिव्याची ही वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नोकरी सांभाळत बिझनेस करत असल्यामुळे दिव्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.