TRENDING:

Mumbai News : मुंबईकरांना मोठा झटका! शहरात रस्ते ओलांडण्यासाठीही आता लागेल 'परवानगी'?, महापालिकेचा प्लॅन काय?

Last Updated:

Mumbai Footpath : मुंबई शहरातील नागरिकांना आता रस्त्या ओलांडताना देखील खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुठूनही रस्ता ओलांडणे शक्य होणार नाही.यामागील नेमके कारण काय ते सविस्तर जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई  : मुंबई शहरातील पादचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. शहरात कुठूनही रस्ता ओलांडणं आता शक्य होणार नाही. कारण पादचारी अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने शहरातील सर्व पदपथांवर मजबूत रेलिंग बसवण्याचे काम सुरू केले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून एप्रिल 2023 पासून आतापर्यंत तब्बल 38,922 मीटर लांबीचे रेलिंग बसवण्यात आले आहे. उर्वरित काम टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे.
मुंबईकरांना मोठा झटका! शहरात रस्ते ओलांडण्यासाठीही आता लागेल 'परवानगी'?, महापालिकेचा प्लॅन काय
मुंबईकरांना मोठा झटका! शहरात रस्ते ओलांडण्यासाठीही आता लागेल 'परवानगी'?, महापालिकेचा प्लॅन काय
advertisement

'या' मुळे केला जातोय बदल

वाहतूक विभागाने मुंबई महापालिकेला रेलिंग बसवण्याची सूचना दिल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. पादचारी कुठल्याही ठिकाणावरून रस्ता ओलांडतात, त्यामुळे अपघातांची संख्या वाढली होती. विशेषतहा वृद्ध, महिला आणि अपंग व्यक्तींच्या सुरक्षेचा विचार करून हे काम राबवले जात आहे.

या प्रकल्पासाठी तब्बल 414 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामध्ये फक्त रेलिंगच नव्हे, तर बाकडी आणि इतर स्ट्रीट फर्निचरचाही समावेश आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार, रेलिंग बसवल्यानंतर नागरिक ठरावीक ठिकाणीच रस्ता ओलांडू शकतील त्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटेल.

advertisement

शहरात वेगाने वाढणारे शहरीकरण आणि वाहनांची संख्या लक्षात घेता पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज होती. त्यामुळे आता मुंबईत कुठेही बिनधास्त रस्ता ओलांडता येणार नाही. पादचारी रेलिंगमुळे नियंत्रित मार्गानेच चालतील अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
सर्व पहा

हा बदल अनेकांसाठी धक्कादायक ठरू शकतो, कारण अनेक भागात नागरिकांना सवय होती रस्ता सोपा दिसला की लगेच ओलांडायचा. पण आता ही सवय बदलावी लागणार आहे. पादचारी सुरक्षा वाढवण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी, सामान्य मुंबईकरांना सुरुवातीला या रेलिंगमुळे त्रास होऊ शकतो. मात्र अपघात टाळण्यासाठी आणि रस्त्यांवरील गोंधळ कमी करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईकरांना मोठा झटका! शहरात रस्ते ओलांडण्यासाठीही आता लागेल 'परवानगी'?, महापालिकेचा प्लॅन काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल