'या' महिन्यापासून करता येणार प्रवास
जेएनपीए बंदरातून देशभरात कंटेनर वाहतूक करणाऱ्या रेल्वे मार्गावरील जुना गव्हाण-चिरनेर पूल तीन वर्षांपूर्वी पाडण्यात आला होता. त्या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू झाले असले तरी ते अत्यंत संथ गतीने चालू होते. या पुलावरून पनवेल, मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच उरण पूर्वेकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. पूल बंद झाल्यानंतर वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र हा पुल दोन महिन्यांत सुरु होणार आहे.
advertisement
गव्हाणफाट्यावर वाहनचालकांचा अतिरिक्त फेरा
वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली असली तरी वाहनचालकांना गव्हाणफाट्यावरून दीड किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. चिरनेरकडून येणाऱ्या वाहनांना पनवेल महामार्गावरील धोकादायक उलट्या दिशेने वळसा घ्यावा लागत आहे. रेल्वे पूल बंद असल्यामुळे जांभूळपाडा, वेश्वी आणि दिघोडे या गावांची एसटी सेवा देखील बंद करण्यात आली होती.
आता पुलाच्या कामाला वेग आल्याने हा पूल लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे हजारो वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचा त्रास कायमचा संपणार असून परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे.
