15 दिवसांत नवी पॉलिसी
“टोलबद्दल मी जास्त सांगणार नाही. पण 15 दिवसांच्य आत अशी पॉलिसी येईल, ज्यामुळं टोलबद्दल तुमची कोणतीही तक्रार असणार नाही. पण मी महाराष्ट्रातील टोलबद्दल बोलत नाही, तर NHI राष्ट्रीय महामार्गांबाबत बोलत आहे,” असं यावेळी गडकरी म्हणाले. अर्थात देशातील एनएचआयच्या टोलबाबत लवकरच नवीन धोरण येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? गडकरींनी दिली नवी डेडलाईन
टोलनाके बंद होणार
“येत्या काळात टोलनाकेच राहणार नाहीत. त्यासाठी सॅटेलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करत आहे. त्यामुळे तुम्हाला कुणीही अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल आणि तुम्ही जिथून निघालात तिथंपासून तुम्ही बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार आहे,” असेही गडकरी यांनी सांगितले. तसेच पुढच्या 2 वर्षांत भारतातील रस्ते हे अमेरिकेपेक्षा चांगले होतील, अशा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, वसंत व्याख्यानमालेत ‘महमार्ग विकासाचा’ या विषयावर बोलताना गडकरी यांनी देशातील रस्ते, पूल, टोलनाके आणि भावी प्रकल्पांबाबत माहिती दिली. मुंबई ते बंगळुरु थेट महामार्ग बनवण्याचं नियोजन असून मुंबई – गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचं सांगितलं. तसेच देशातील लॉजिस्टिक कॉस्ट 16 टक्क्यांवरून 9 टक्क्यांपर्यंत खाली आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.