ऑक्टोबरपासून सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण मार्गावर नवीन रेल्वे ट्रेन सुरु केल्या जाणार आहेत. ऑक्टोबरपासून या रेल्वे मार्गावर नवीन 20 रेल्वे फेऱ्यांचा वेळापत्रकात समावेश करण्यात येईल. नवीन वेळापत्रकामध्ये 10 अप आणि 10 डाउन अशा अतिरिक्त रेल्वे फेऱ्यांचा वेळापत्रकामध्ये समावेश केला जाणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे फेऱ्यांची संख्या लवकरच 40 वरून 60 पर्यंत जाणार आहे. सध्या सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण मार्गावर ४० अप- डाउन रेल्वे चालवल्या जात आहेत. सध्या सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण या रेल्वे मार्गावर फार मोठ्या फरकाने रेल्वे धावत आहे. आणखीन रेल्वेच्या संख्येंमध्ये वाढ केल्यानंतर तो फरकही आणखीनच भरून निघेल.
advertisement
सध्या सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण मार्गावर दर एक तासाने रेल्वे धावत आहे. दुपारी गर्दी नसल्यामुळे या मार्गावर 90 मिनिटांनी ट्रेन आहे. या मार्गावरील प्रवाशांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने 1 तासांच्या फरकाने रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 8 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई एअरपोर्टचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर एअरपोर्ट जवळील तरघर रेल्वे स्थानकाचंही काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे नवी मुंबई एअरपोर्ट सुरु झाल्यानंतर या मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आणखीनच रेल्वे सेवा वाढवणार आहे. सीवूड्स दारावे- उरण सोबतच बेलापूर- उरण मार्गावरील ट्रेनच्याही संख्या वाढवणार आहे.
बेलापूर- उरण मार्गावर पहिले प्रवाशांना 1 तास पुढच्या ट्रेनसाठी वाट पाहावी लागायची. आता या मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या नंतर आता प्रवाशांना कमी वेळ वाट पाहावी लागणार आहे. 10 अप आणि 10 डाउन अशा 20 रेल्वे फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरीलही प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.