नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. याच परिसरात आपल्याला घर खरेदीची सुवर्णसंधी आहे. सिडकोकडून लवकरच एक बंपर लॉटरी जाहीर करण्यात येणार असून या लॉटरीत तब्बल 22000 घरांचा समावेश असणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या दसरा किंवा दिवाळीच्या मुहूर्तावर ही लॉटरी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
advertisement
MHADA Lottery 2025 : म्हाडामध्ये घर घेणे महाग की होणार सोपे? जाणून घ्या किती येणार खर्च
किमती कमी करण्याची मागणी
सर्वसामान्यांना परवडणारी घरं म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून दिली जातात. मात्र, सिडकोच्या घरांचे सध्याचे दर हे जास्त असून घरांच्या किमती आणखी कमी करण्याची मागणी सातत्याने होत असते. याबाबत सरकारसोबत चर्चा सुरू असून या किमती येत्या काळात कमी होण्याची अपेक्षा आहे, असे विजय सिंघल यांनी म्हटलंय.
दरम्यान, सिडको घरांच्या किमती आणि इतर कारणांमुळे गेल्या पाच वर्षांत विविध लॉटरीतील अनेक घरांची विक्रीच झालेली नाही. अनेक घरे विक्री न झाल्याने पडून आहेत. ही घरे आणि आता बांधकाम पूर्ण होत आलेली घरे यांची जम्बो लॉटरी काढण्याची तयारी सिडकोकडून सुरू आहे.
घरांचे लोकेशन काय?
सिडकोच्या जम्बो लॉटरीतील घरे ही नवी मुंबईतील विविध नोडमध्ये उपलब्ध असतील. यामध्ये नवी मुंबईतील वाशी, जुईनगर, खारघर आणि पनवेलमधील तळोजा, द्रोणगिरी या नोडचा समावेश असेल. लवकरच या लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून घरांच्या किमती आणि इतर माहितीसाठी वाट पाहावी लागेल.