जानेवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत अंतिम टप्पा मार्गी लागून वाहनचालकांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे मरिन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी अप आणि डाऊन मार्गावर वाहनांचा प्रवास सुसाट होणार आहे. मुंबई सागरी किनारा मार्ग हा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे.
लिटील लिटील म्हणत घेताय दारू होऊ शकतो मधुमेह, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
advertisement
10.58 किमीचा हा मार्ग आहे. या मार्गातील पहिला टप्पा म्हणजेच वरळीतील बिंदू माधव ठाकरे चौक ते मरिन ड्राइव्ह दक्षिण वाहिनी 11 मार्च 2024 ला खुली करण्यात आली. तर मरीन ड्राइव्ह ते हाजी अली मार्ग लोटस जंक्शनपर्यंत 10 जून 2024 रोजी सुरू झाला. त्यानंतर 11 जुलैला हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा साडे तीन किमीचा मार्ग सुरू झाला.
हा मुंबईचा महत्त्वाचा प्रकल्प सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच 34 टक्के इंधन बचत आणि 70 टक्के वेळेची बचतही होणार असल्याचा दावा मुंबई पालिकेने केला आहे. पहिला टप्प्यात प्रियदर्शनी ते मरिन ड्राइव्हपर्यंत साडेतीन किलोमीटर लांबीचा बोगदाही सेवेत येणार आहे. त्यामुळे वरळी सी फेस ते मरिन ड्राइव्ह असा सध्या अर्धा ते पाऊण तासांचा असलेला प्रवास दहा ते पंधरा मिनिटांत होणार आहे. या बोगद्यातून साधारण तीन ते चार मिनिटांत प्रवास पूर्ण होईल.