प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष गाड्या धावणार
सलग सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यानुसार मध्य रेल्वेने राज्यांतर्गत विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि सुविधा वाढविण्यासाठी सुरू करण्यात आल्या आहेत.
CSMT ते कोल्हापूर विशेष गाडीचे वेळापत्रक
24जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर विशेष गाडी रात्री 12.30 वाजता सुटेल. ही गाडी 26 जानेवारी रोजी परतीचा प्रवास करेल.
advertisement
LTT ते नांदेड विशेष रेल्वे वेळापत्रक
लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड विशेष रेल्वे 23 आणि 24 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता सुटेल. ही गाडी नांदेड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता पोहोचेल. नांदेडहून परतीची गाडी 24 आणि 25 जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजता निघेल.
पनवेल ते अमरावती विशेष गाडी वेळापत्रक
पनवेल ते अमरावती विशेष गाडी 26 जानेवारी रोजी पनवेलहून सायंकाळी 7.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता अमरावती पोहोचेल.
असे असतील थांबे
या गाड्या अनेक स्थानंकावर थांबवण्यातही येणार आहेत ज्यात कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर आणि बडनेरा यांचा समावेश आहे.
साधारण प्रवासी, विद्यार्थी आणि कामगारांसाठी ही गाड्या प्रवास सुलभ, आरामदायक आणि खर्चिक दृष्ट्या फायदेशीर ठरतील. प्रवाशांनी तिकीट आधी बुक करणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रवासाच्या दिवशी तिकीट मिळविण्यात अडचण येणार नाही.
