सीएसएमटी लोकल लाईन रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यावर असताना 9 जुलै रोजी रमेश टाकळकर यांना ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे पासबुक आणि तब्बल 30 लाख रुपये किमतीचा सही केलेला चेक सापडला. टाकळकर यांनी लगेच पासबुक आणि चेक पोलीस ठाण्यात आणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्यासमोर हजर केला. तेव्हा पोलीस निरीक्षक सचिन गवते यांनी चेक आणि पासबुक यांवरील माहितीच्या आधारे पासबुकधारकाचा शोध घेतला.
advertisement
सदर चेक आणि पासबुक सौरभ राजू शेट्टे या व्यावसायिकाचे असल्याचे समजले. तेव्हा त्याला फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. तसेच खात्री करून 30 लाख रुपये किमतीचा चेक आणि पासबुक परत करण्यात आले. रेल्वे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी कर्तव्य प्रामाणिकता दाखवत तत्परतेने चेक आणि पासबुक परत केले. त्यामुळे सौरभ शेट्टे यांनी पोलिसांचे आभार मानले. तसेच सर्वसामान्यांकडूनही पोलिसांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.