Ganeshotsav 2025: पुण्यात गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांवर कारवाई होणार? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ढोल-ताशा पथकांबाबत मोठा निर्णय झाला. यंदा डीजे बंद करणार असल्याचे पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.
पुणे: महाराष्ट्रात सण, समारंभ आणि उत्सवांत पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. ढोल-ताशा तर गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग झाला आहे. पुण्यात अनेक ढोल-ताशा पथके आहेत. या ढोल-ताशांसारख्या पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत. तसे असतील तर ते नक्कीच थांबवू आणि यंदा पारंपरिक वाद्यांवर खटले दाखल होणार नाहीत, असे आश्वासन पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी ढोल-ताशा महासंघाला दिले आहे. तसेच गतरर्षी लेझर लाइट बंद करण्यात यश मिळाले असून यंदा डीजे बंद करण्याचे प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
ढोल-ताशा महासंघ महाराष्ट्रच्या वतीने पुणे शहरात ढोल-ताशा पथकांचा प्रातिनिधिक वाद्यपूजन कार्यक्रम पार पडला. ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात हा कार्यक्रम झाला. यावेळी परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कसबा गणपती मंदिराचे मुख्य विश्वस्त उपस्थित होते.
advertisement
रात्री 10 पूर्वी सराव बंद करा
“जेव्हा ढोल-ताशा पथके सराव करतात. तेव्हा रात्री 10 नंतर पोलिस मुख्यालयात तक्रारींचे अनेक दूरध्वनी येतात. त्यामुळे सर्व पथकांनी सराव लवकर सुरू करून रात्री 10 पूर्वी बंद करणे गरजेचे आहे. आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, याची काळजी ढोल-ताशा पथकांनी घ्यावी,” असे रंजनकुमार शर्मा म्हणाले.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 11, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav 2025: पुण्यात गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांवर कारवाई होणार? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती