Pune – Nagpur Railway: प्रवाशांसाठी खूशखबर! पुणे – नागपूर, कोल्हापूर – नागपूर गाड्यांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Kolhapur – Nagpur Railway: पुणे विभागातून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशा प्रवाशांसाठी खूशखबर असून आता रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे: पुणे विभागातून धावणाऱ्या पुणे - नागपूर आणि कोल्हापूर – नागपूर या गाड्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. या गाड्यांना गर्दी वाढली असली तरीही दोनच जनरल डबे आहेत. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने जनरल डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत होती. आता प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार या दोन्ही गाड्यांना 5 सप्टेंबरपासून चार जनरल डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे – नागपूर आणि कोल्हापूर – नागपूर या दोन्ही गाड्या पुणे रेल्वे विभागातून दररोज धावतात. पुण्यातून विदर्भात जाणारी दैनंदिन प्रवासी संख्या मोठी असून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अनेक प्रवासी नाइलाजाने खासगी बसमधून प्रवास करतात. पुणे ते नागपूरदरम्यान ट्रेनचे तिकीट जनरल 160, स्लीपर 380 रुपये आहे. तर खासगी ट्रॅव्हल्सला दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागतात. अनेक वेळा रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दोन्ही गाड्यांना जनरल डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत होती.
advertisement
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे गाड्यांचे डबे वाढवम्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. त्यामुळे पुणे – नागपूर आणि कोल्हापूर – नागपूर या दोन्ही गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय घेतला असून याचा फायदा प्रवाशांना होईल, असे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहेरा यांनी सांगितले.
advertisement
रेल्वेचा प्रवास स्वस्तात होणार
पुणे आणि परिसरातून विदर्भ आणि खान्देशात जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अनेकदा रेल्वे तिकीट न मिळाल्याने या प्रवाशांना खासगी बसने दीड ते दोन हजार रुपये मोजून प्रवास करावा लागतो. मात्र, रेल्वेने डब्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून दररोज 600 प्रवाशांची सोय होणार आहे. विशेष म्हणजे केवळ 160 रुपयांत त्यांचा प्रवास होईल.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 11, 2025 9:26 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune – Nagpur Railway: प्रवाशांसाठी खूशखबर! पुणे – नागपूर, कोल्हापूर – नागपूर गाड्यांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय