नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 23 मार्च रोजी पीडित वृद्धाला एक व्हिडिओ कॉल आला होता. त्यात कॉल करणऱ्या व्यक्तीने स्वत:ला दिल्ली एटीएसचा अधिकारी असल्याचे सांगितले. धक्कादायक गोष्ट म्हणजे वृद्ध व्यक्तीला दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीने तुमचे सीमकार्ड वापरुन बँक खाते उघडले आणि त्यातून अडीच कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली असल्याने तुम्ही संशयित आहात, असे सर्व सांगून घाबरवण्यात आले.
advertisement
यानंतर आरोपींनी सलग तीन दिवस व्हिडिओ कॉलवर वृद्धाचा मानसिक छळ सुरु ठेवला. त्यात त्याने केलेल्या चौकशीच्या नावाखाली बँक खात्याची माहिती घेतली आणि 1 कोटी 54 लाख रुपये एका खात्यावर ट्रान्सफर करुन घेतले.
अखेर पोलिस ठाण्यात वृद्धाची धाव
अखेर 31 मार्च रोजी आरोपींनी वृद्धाला पनवेल पोलिस ठाण्यात जाऊन निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र घेण्यास सांगितले. मात्र ते पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर पुन्हा फोन करून आम्हीच पत्र घरी पाठवतो असे सांगून त्यांना परत पाठवले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
