TRENDING:

सिद्धिविनायक गणपती मंदिर राहणार बंद, वेळापत्रकात मोठा बदल, कारण काय?

Last Updated:

मुंबईतील श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दर्शन आणि पूजा वेळापत्रकात बदल जाहीर करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला दररोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दर्शन आणि पूजा वेळापत्रकात बदल जाहीर करण्यात आले आहेत. हे बदल 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहेत.
News18
News18
advertisement

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा, मंगळवार, 3 मार्च 2026 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण स्पर्श दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी, तर ग्रहण मोक्ष सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात प्रस्तावित असल्याने चंद्र उगवताना ग्रस्त अवस्थेत दिसणार आहे.

Weather Alert : महाराष्ट्र आता तापणार, शनिवारी लाट येणार; हवामान खात्याचा अलर्ट

advertisement

ग्रहण स्पर्श – दुपारी 3.20

ग्रहण मोक्ष – सायं. 6.48

ग्रहणकाळात सूर्योदयापासून मोक्षापर्यंत वेध पाळले जाणार आहेत. पहाटेच्या पूजा-आरतीत बदल नाही. दुपारी नैवेद्य होणार नाही. दुपारी 3 ते सायंकाळी 7.30 या वेळेत गाभाऱ्यातील दर्शन बंद राहील. मात्र बाहेरील दर्शन सुरू राहणार आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारला जाणार नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबाच्या दरात उलथापालथ, आल्याला 9000 रुपये मिळाला भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

सायंकाळी 7.30 वाजता धूपारती होईल. त्यानंतर नेहमीप्रमाणे दर्शन सुरू राहील. रात्री 9 वाजता पूजा, तर 9.30 वाजता महानैवेद्य आणि आरती होणार आहे. तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी.

मराठी बातम्या/मुंबई/
सिद्धिविनायक गणपती मंदिर राहणार बंद, वेळापत्रकात मोठा बदल, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल